Sudhir Mungantiwar : शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे, सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती जोरदार टीका

maharashtra political news : देव करो यांना सायकलवर फिरायला लागो. पेट्रोल डिझेलची किंमत इतर राज्ये कमी करत आहेत. त्यांच्याकडून काही तरी शिका असा टोला देखील मुंनगटीवार यांनी लगावला. तसेच अनेक नेत्यांना अडकवण्यासाठी पोलिसांचा दुरुपयोग राज्यात केला जात आहे.

Sudhir Mungantiwar : शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे, सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती जोरदार टीका
सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती जोरदार टीका Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 1:45 PM

मुंबई –जीएसटी (GST) दिला जातो, पैसे देणे बाकी आहे याचा अर्थ राज्य सरकारने कामे थांबवायची असे होत नाही. या सरकारची अडचण ही आहे, की यांना काम करता येईना. मग जीएसटी आला नाही असे म्हणायचे का ? फक्त महाराष्ट्राचा (Maharshtra) जीएसटी थांबला आहे का? इतर राज्याचे मुख्यमंत्री रडताना पाहिलेत का? हे सरकार बेईमानी करत आले आहे. हे पहिले सरकार असे आहे की, यांनी रोजगार हमी योजनेचे पैसे दिलेले नाहीत. तसेच सरकारने अनुदान देखील दिलेले नाही. सध्याचं सरकार गरिबाला केंद्रबिंदू मानून चालवत नाही. विशेष म्हणजे मंत्रालयात (Mantralay) आज निर्णय घेतले जात नाही. कॅबिनेटमध्ये मोहाच्या दारूला विदेशी म्हणा असा निर्णय होतो” अशी टीका सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती केली.

देव करो यांना सायकलवर फिरायला लागो

देव करो यांना सायकलवर फिरायला लागो. पेट्रोल डिझेलची किंमत इतर राज्ये कमी करत आहेत. त्यांच्याकडून काही तरी शिका असा टोला देखील मुंनगटीवार यांनी लगावला. तसेच अनेक नेत्यांना अडकवण्यासाठी पोलिसांचा दुरुपयोग राज्यात केला जात आहे. हे सरकार कधीही जनतेच्या धक्क्याने जाऊ शकतं. जे आमदारांचा अपमान करतात त्यांनी माफी मागावी. इथे येणारे आमदार घोडे आहेत का? तुम्ही विकाऊ आहात आमदारांवर शंका उपस्थित करू नका. भाजपला त्यांचा उमेदवार निवडून आणता येईल हा विश्वास आहे. मग तुमचा हट्ट का?, मी प्रत्येक आमदारांना सांगू शकतो की यांनी तुमचा अवमान केला आहे.

शिवसेना काँग्रेसचा बी टीम आहे

शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे. सर्जिकल स्ट्राईकवर टीका करणारी शिवसेना सर्जील उस्मानी आणि सावरकरांचा अवमान झाला तेव्हा एक शब्द बोलली नाही. काँग्रेसने कोणाला उमेदवारी दिली, त्यांनी अनेकदा वादग्रस्त भाषण केली. ज्याने संविधानाला विरोध केला त्याला उमेदवारी दिली. ती जागा आम्ही का मागे घेऊ, ती जागा आम्ही लढवणार आहोतच. अपक्ष काय तुमच्या तिकिटावर निवडून आले आहेत का?, तुम्हाला पाठिंबा दिला तर ते काय आयुष्य भर तुमच्या सोबत राहणार असे वचन दिले आहे का.

हे सुद्धा वाचा

ते भाजपच्या बाजूने पण येतील ना, तुम्ही आता तुमचे आमदार सांभाळा अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवरती केली.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.