वारिस पठाण औरंगजेबाचे ‘वारिस’, त्यांना 100 मावळेही अडचणीत आणतील : सुधीर मुनगंटीवार

माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांच्यावर जोरदार टीका केली

वारिस पठाण औरंगजेबाचे 'वारिस', त्यांना 100 मावळेही अडचणीत आणतील : सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Feb 23, 2020 | 12:05 AM

चंद्रपूर : एमआयएम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागं घेतलं असलं, तरी थेट माफी मागितलेली नाही. यावरुन माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांच्यावर जोरदार टीका केली (Sudhir Mungantiwar on Waris Pathan). वारिस पठाण औरंगजेबाचे वारीस झाले असून त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील, असं म्हणत मुनगंटीवार यांनी वारिस पठाण यांना लक्ष्य केलं. वारिस पठाण यांनी माफी मागितली असती, तर बरं झालं असतं, असं म्हणत जनता त्यांना माफ करणार नाही, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारच्या कामावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “सोमवारपासून (24 फेब्रुवारी) सुरू होणाऱ्या अधिवेशनात ठाकरे सरकारने उत्तम निर्णय घेतले, तर आमचं त्यांना समर्थन राहणार आहे. आमच्या सोबत असताना केलेली 25,000 रुपये प्रति हेक्‍टर नुकसानभरपाईची मागणी आता त्यांनी खरी करुन दाखवावी. बारा तास मोफत वीज देण्यासोबतच 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर गौरव प्रस्ताव मंजूर करण्याचा विषय भाजप विधिमंडळात विषय लावून धरणार आहे.”

औरंगाबादचे संभाजीनगर असं नामकरण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसची मदत घेण्याची भूमिका घेतली, हे मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलं. राज्यातील महिला अत्याचाराबाबत धोरण जाहीर करावं यासाठी हा मुद्दा विधिमंडळात लावून धरणार असल्याचंही मुनगंटीवारांनी यावेळी नमूद केलं.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेली भेट राज्याची परंपरा दर्शवणारी असून या भेटीत राज्याच्या मदतीचे विषय चर्चिले गेले असतील, असंही मुनगंटीवार म्हणाले. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची अस्वस्थता संपवण्यासाठी त्याचा तपशील मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

Sudhir Mungantiwar on Waris Pathan

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.