सुनेत्रा अजित पवार यांचे सहा नातेवाईक लोकसभेच्या रिंगणात
बारामती : निवडणुकांमध्ये नातीगोती हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे एक-दोन नव्हे, तब्बल सहा नातेवाईक लोकसभा निवडणूक लढवत आहेत. घरात नणंद सुप्रिया सुळे आणि स्वतःचा मुलगा पार्थ तर आहेच, पण याव्यतिरिक्त राज्यातील इतर मतदारसंघांमध्येही एकूण सहा नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे अजित पवारांना […]
बारामती : निवडणुकांमध्ये नातीगोती हा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे एक-दोन नव्हे, तब्बल सहा नातेवाईक लोकसभा निवडणूक लढवत आहेत. घरात नणंद सुप्रिया सुळे आणि स्वतःचा मुलगा पार्थ तर आहेच, पण याव्यतिरिक्त राज्यातील इतर मतदारसंघांमध्येही एकूण सहा नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे अजित पवारांना राज्यातील या सहा मतदारसंघांमध्ये स्वतःच्या नातेवाईकाविरोधात किंवा स्वतःच्या नातेवाईकसाठी प्रचार करावा लागणार आहे.
सुनेत्रा पवार आणि लोकसभेचे सहा उमेदवार
सुप्रिया सुळे : राष्ट्रवादी, बारामती : नणंद
पार्थ पवार, राष्ट्रवादी, मावळ, मुलगा
कांचन कुल, भाजप, बारामती : भाची (भावाची मुलगी)
राणा जगजितसिंह पाटील : राष्ट्रवादी, उस्मानाबाद, पुतण्या
ओमराजे निंबाळकर, पुतण्या, शिवसेना,उस्मानाबाद
कुणाल रोहिदास पाटील, धुळे, काँग्रेस, भाचा
बारामतीत रंगतदार लढत
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या पवार कुटुंबीयांच्या जवळच्या नात्यातील आहेत, इतकंच काय तर त्या बारामती तालुक्यातल्या आहेत. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने कांचन या कुल घराण्याच्या सून बनल्यात. त्यामुळे नात्यातल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.
बारामती तालुक्यातल्या वडगाव निंबाळकर येथील राजेनिंबाळकर या घराण्याचं मोठं प्रस्थ आहे. हे कुटुंब उस्मानाबादच्या पाटील कुटुंबीयांशी संबंधित आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही उस्मानाबादच्या पाटील कुटुंबातील सदस्य आहेत. वडगाव निंबाळकर येथील विजयसिंह उर्फ कुमारराजे निंबाळकर हे त्यांचे चुलत बंधू आहेत. तर कांचन कुल या विजयसिंहांच्या कन्या. कांचन कुल यांनी बारामतीजवळच असलेल्या शारदानगर शैक्षणिक संकुलात आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलंय. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या त्या पत्नी आहेत. कांचन यांच्या लग्नासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत कुल कुटुंबीयांशी सोयरीक जुळवली होती.