Supreme court on Eknath shinde vs shiv sena Live : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; अनिल देसाई यांची माहिती

| Updated on: Aug 26, 2022 | 1:39 PM

supreme court hearing on Eknath shinde vs shiv sena Live Maharashtra Updates : आज राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोठा दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच सध्याच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने या निर्णयाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

Supreme court on Eknath shinde vs shiv sena Live : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; अनिल देसाई यांची माहिती
Image Credit source: tv9 marathi

आज दिनांक 22 ऑगस्ट 2022 आजचा दिवस राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषावर सुप्रीम कोर्टात सुनावणी (eknath shinde vs shiv sena live) होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरच (supreme court hearing live) सध्याच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याने सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे आज ओबीसी आरक्षणावर देखील सुनावणी आहे. तसेच आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे (Monsoon session live). मागील दोन दिवस वादळी ठरले आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी कामकाजादरम्यान एकोंमेकांवर आरोप, प्रत्यारोप केल्याचं पहायला मिळालं. आजचा तिसरा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सुनावणी आहे. ज्यामध्ये राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापन्यासाठी दिलेली परवानगी, विधानसभा अध्यक्षांची निवड, 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई, विधानसभेत नव्या सरकारने सिद्ध केलेले बहूमत तसेच धनुष्यबाण चिन्हा कोणाचे अशा विविध याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Aug 2022 10:33 AM (IST)

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; अनिल देसाई यांची माहिती

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार होती. मात्र काही कारणांमुळे सुनावणी आता उद्या होणार आहे. याबाबत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी उद्या होणार आहे. उद्या कोर्टात कोणतंही म्हणणं मांडलं जाणार नाही, निकालासाठी केस राखून ठेवली आहे. उद्या मोठ्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाणार की वेगळा निकाल कोर्ट देणार याबाबत निर्णय होणार असल्याचे देसाई यांनी म्हटलं  आहे.

  • 22 Aug 2022 09:59 AM (IST)

    अनिल परब, सुभाष देसाई सुप्रिम कोर्टात दाखल

    अनिल परब, सुभाष देसाई सुप्रिम कोर्टात दाखल

  • 22 Aug 2022 09:49 AM (IST)

    Eknath shinde vs shiv sena : न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार गैरहजर असल्याने सुनावणी मंगळवारी!

    शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता उद्या होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या याचिकांवर सुप्रीम कोर्टात तीन न्यायमूर्तींच्या  खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. यामध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्या. सी. टी रविकुमार व न्या. हिमा कोहली यांचा समावेश आहे. परंतु आज काही कारणांमुळे न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार गैरहजर असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहित समोर आली आहे.

  • 22 Aug 2022 09:39 AM (IST)

    उद्धव ठाकरे, विनायक राऊतांकडून मध्यावधी निवडणुकांचे संकेत

    सध्या शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या विविध याचिका सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहेत. या याचिकांवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विनाय राऊत यांच्याकडून मध्यावधी निवडणुकांचे संकेत देण्यात आले आहेत. केव्हाही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

  • 22 Aug 2022 09:10 AM (IST)

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता

    राज्यात सध्या मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आहेत. शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर आज होणारी सुनावणी आता उद्या म्हणजे मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

  • 22 Aug 2022 09:07 AM (IST)

    मंगळवारी शिवसेना निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडणार

    आज राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणीची शक्यता होती. मात्र ही सुनावणी काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या विविध सुनावणींवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकते.  दरम्यान उद्याच शिवसेना केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडणार आहे. कागदपत्रे सादर करण्यास निवडणूक आयोगाने दिलेली मुदत उद्या संपत आहे. मुदत संपण्यापूर्वीच शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.

  • 22 Aug 2022 08:09 AM (IST)

    शिंदे गाटातील आमदारांमध्ये नाराजी; रोहीत पवारांचा दावा

    एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जे आमदार गेले होते त्यातील अनेक आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

  • 22 Aug 2022 07:39 AM (IST)

    शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर?

    आज महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज होणारी सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. या सुनावणीचा समावेश हा सुनावणी यादीमध्ये करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

  • 22 Aug 2022 07:14 AM (IST)

    न्यायालयावर आमचा विश्वास – रोहीत पवार

    आज सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर सुनावणीची शक्यता आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी म्हटलं आहे की, न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. निकाल पुढे ढकलून चालणार नाही. मात्र जो निकाल असेल तो लोकशाही आणि संविधानाला धरून असणे महत्वाचे असल्याचे पवार यांनी म्हटलं आहे.

  • 22 Aug 2022 07:10 AM (IST)

    शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना – संतोष बांगर

    आज शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे?,  16 आमदारांवर कारवाई होणार का अशा? अशा विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांचा शिवसेनेवर दावा सांगणे सुरूच आहे. शिंदे गट नव्हे तर आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.

Published On - Aug 22,2022 6:53 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.