SC on Shiv Sena vs Eknath Shinde LIVE : मुख्यमंत्र्यांचा वादळी पूर दौरा, फडणवीसही सोबतच, विदर्भाला मदत किती मिळणार?
राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई – शिवसेनेतली गटनेतेपदाची लढाई सुप्रीम कोर्टात दाखल झाली असून सोबतच 16 आमदारांच्या निलंबनासह शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या तक्रारीची याचिका देखील न्यायालयात आहे. यावर 11 तारखेला सुनावणी होणार आहे. ठाकरेंसोबत उरलेल्या गटाच्या व्हिपचे उल्लंघन झाल्याचे तत्कालीन पीठासीन अधिकारी नरहरी झिरवळ यांनी रेकॉर्डवर घेतले होते. तर त्यानंतर काही तासांत, नवे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या व्हिपचे उल्लंघन झाल्याचे रेकॉर्डवर घेतले. त्याआधारे विधिमंडळ सचिवांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याचं प्रश्नावरही सुप्रीम कोर्टात आज सोमवार 11 जुलै रोजी खल होणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
अमित ठाकरे यांनी दिबांच्या घरी चहाचा आस्वाद घेतला
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत. मनसेचे महासंपर्क अभियान सुरु आहे. अमित ठाकरे यांनी आज दिनांक 11 जुलै रोजी लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या पनवेल येथील निवासस्थानी जाऊन त्यांना अभिवादन केले. दिबांचे सुपुत्र अतुल पाटील व त्यांच्या सौभाग्यवतीने अमित ठाकरे यांचे स्वागत केले. दिबांच्या कार्याची महती उभयतांनी अमित ठाकरे यांना सांगितली. त्याच वेळी अमित ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळासाठी दिबांच्या नावाचा पुरस्कार केला. त्याच बरोबर अतुल पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अतुल पाटील यांनी आपल्या मातोश्री उर्मिलाताई पाटील यांनी लिहिलेले पुस्तक अमित ठाकरेंना भेट दिले. छोटेखानी झालेल्या या सभारंभात अमित ठाकरे यांना चहा घेण्याचा आग्रह केला. अमित ठाकरे यांनी आपण चहा घेत नसल्याचे यावेळी सांगितले. मात्र पाटील साहेबांच्या घरातून चहा घेतल्याशिवाय कोणीही परत जात नाही, अशी आवर्जून विनंती केल्यानंतर अमित ठाकरे यांनी दिबांच्या घरी चहाचा आस्वाद घेतला.
-
ठाण्यातील कोपरी येथील प्रभाग समितीच्या तिसऱ्या मजल्यावरील निकामी झालेला सज्जा पडल्याची घटना घडली
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्या वरील दुचाकी व चारचाकी वाहनांवर पडल्याने वाहणांचे नुकसान झाले आहे. तसेच लाकडी प्लास्टिक लावलेले छप्पर देखील पडून नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्नी शमन दल व पालिका अधिकारी यांनी गाड्या आणि छप्परला देखील बाजूला केले आहे. तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
-
-
काही वेळात मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती च्या सभागृहात थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासनासह बैठक होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणी भागात कालपासून निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री थेट गडचिरोलीत दाखल होत आहेत. मुंबई वरून नागपुरात दाखल झाल्यानंतर दोघे हेलिकॉप्टर ने गडचिरोलीला येणार होते. मात्र, नागपूर आणि परिसरात पाऊस असल्याने आणि हवामान अनुकूल नसल्याने हेलिकॉप्टरचा प्रवास शक्य झाला नाही. परिणामी दोघांनी सुमारे 160 किमीचा प्रवास सडक मार्गाने करण्याचा निर्णय घेतला.
गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात प्रशासनाची आढावा बैठक होणार असून, पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने उचललेले पाऊल आणि पुढे दोन तीन दिवस पावसाची परिस्थिती असल्याने प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री खालील विषयांवर घेणार आढावा
- गडचिरोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस
- आलापल्ली भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून पूर आल्यामुळे कच्चा रस्ता वाहून गेला होता
- भामरागड तालुक्यातील पेरमिली येथे पुरात एक ट्रक वाहून त्यात तिघांचा मृत्यू झाला
- कुमरगुडा नाल्यात पाण्याचा अंदाज न समजल्यामुळे एक विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला
- सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग चार ठिकाणाहून पूर परिस्थितीमुळे बंद होता
- सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांनी भरलेला असल्यामुळे याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत
- अहेरी तालुक्यात तलावाचे पाणी 20 ते 22 घरामध्ये घुसले होते झालेल्या नुकसानीचा आढावा
- गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठं पॅकेज घोषित करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती
- मागील वर्षी उद्भवलेली परिस्थिती उद्भवू नये म्हणून Sdrf सह अनेक पूर परिस्थिती नियंत्रण तुकड्या तयार करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना देणार आदेश
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
संजय मंडलिक दिल्लीत आहेत. त्यांनी कळवलं होतं हजर न राहण्याबाबत तसेच इतर खासदारांनीही सांगितलं होतं. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी हे फक्त दोन खासदार बैठकीला उपस्थित नव्हते. बैठकीत सर्व विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रपती निवडणुकींबाबतही चर्चा झाली. शिवसेनेने राजकारणाच्या पलिकडे जाऊन राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला आहे.सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना दिला आहे. त्यांचा आदेश बंधनकारत आहे. मी नाराज नाही, जो पक्षाचा निर्णय असेल. त्याला माझा पाठिंबा असेल. अशा बातम्या कुणीही चालवू नका. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या मागे सर्व खासदार उपस्थित राहतील, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेना ही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची आहे. दुसऱ्या कुणाचीही नाही. पदावर ठेवण्याचे आणि हटवण्याचे अधिकारही त्यांचेच आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आमचे सर्वांचेच गुरू होते. तसे गुरू लाभणे हे आमचं भाग्य. त्यांनी दिशा दाखवली. त्यांनी पुढे नेलं. त्यांनी शिवसेना निर्माण केलं. या गुरूला मानवंदना देणं हे आमचं कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे आता शिवसेनचे नेतृत्व करत आहेत. तेही आता गुरूस्थानी आहेत. जे नेतृत्व करतात ते गुरूस्थानी आहेत.
-
-
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहे. तिकडे सध्या पुराने वेढा घातलेला आहे. मुख्यमंत्र्याचा हा दौरा कुणालाही माहिती नव्हता. मुख्यमंत्री नागपूर विमानतळावर पोहचले तेव्हाचा फोटोही समोर आला आहे.
मुख्यमंत्र्यांचा विमानतळावरील फोटो
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
गडचिरोली पूरग्रस्त परिस्थिती असल्याने पाहणी करणार आहोत, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार, यंत्रणा अलर्ट आहे, जीवित हानी होणार नाही यासाठी अलर्ट आहोत, सूचना दिल्या आहेत, मालमत्ता आणि जीवित हानी होणार नाही, नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, राज्यातील इतर भागातही विशेष सूचना दिल्या आहेत, स्टेट डिजास्तर डिपार्टमेंट, मिल्ट्री, ndrf सर्वांशी चर्चा झाली आहे, त्यांना अलर्ट केलं आहे, कुठलीही यंत्रणा कमी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
-
शिवसेना आमदार अंबादास दानवे Live
ही बैठक नव्हती आम्ही शिवसेनाप्रमुखांना भेटायला आलो होतो. नव्वद टक्के लोक शिवसेनेसोबतच आहोत. काही लोकांनी गद्दारी केली आहे. मात्र आम्ही सोबत आहोत, हे सांगायला आलो होतो. सर्व खासदार बैठकीत आहेत. योग्य ती भूमिका, पक्षप्रमुख मांडतील. अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आंबादास दानवे यांनी बैठकीनंतर दिली आहे.
-
गजानन कीर्तिकर यांची शिवसेनेच्या बैठकीनंतरची प्रतिक्रिया
– आजच्या शिवसेनेच्या बैठकीसाठी चार खासदार अनुपस्थित होते. यामध्ये एक भावना गवळी आणि दुसरे श्रीकांत शिंदे गैरहजर होते.
तर संजय जाधव आणि आणखी एक खासदार आजारपणामुळे बैठकीला अनुपस्थित होते.
आदिवासी महिला द्रोपर्दी मुर्मू या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार आहेत. तर आम्ही सर्व खासदारांनी त्यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.
त्यानुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक दोन दिवसांत निर्णय घेतील.
कलाबेन डेलकर यांचा भाजपला जरी विरोध असला, तरी राष्ट्रपती पदाची निवडणूक राजकीय नाही. त्यामुळे त्या शिवसेनेसोबत असतील.
-
उरण-अमित ठाकरे दौरा
मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान दौऱ्यावर उरण येथे अमित ठाकरे यांच जंगी स्वागत करण्यात आलंय
मनसे नेते अमित ठाकरे यांनी उरण येथील मनसे शाखेला देखील भेट दिली
तसेच मनसे कार्यकर्त्यांशी व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आहे
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री नागपूर विमानतळावर दाखल
नागपूरवरून ते गडचिरोलीकडे निघणार
गडचिरोली मधील पूर परिस्थितीचा आढावा घेणार
-
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्राविरोधात बोदवड शहरात गॅस दरवाढीवरून आंदोलन
दिवसेंदिवस गॅस दरवाढ मोठ्या मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे हैराण झाले आहेत. याच्याच निषेधार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.
-
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचं पत्र
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र
आदित्य ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
आरे वाचवा आंदोलनात 18 वर्षाखालील मुलांचा सहभाग ?
3 दिवसांत कारवाई करून अहवाल द्या – आयोग
-
खासदारांच्या बैठकीनंतर मातोश्रीवर पुण्यातील पदाधिकाऱ्यांची होणार बैठक
बैठकीला शहराध्यक्ष , प्रमुख पदाधिकारी , नगरसेवक राहणार उपस्थित
पुण्यात लवकरच युवा सेनेत नियुक्त्यांची शक्यता
दोन दिवसांपूर्वी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेत राजीनामे
लवकरच आदित्य ठाकरे करणार नवीन नियुक्त्या
आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बैठकीसाठी बोलावल्याची सूत्रांची माहिती
पुण्यातील कार्यकर्ते शिंदे गटात जाणार नाहीत यासाठी मोर्चेबांधणी
-
अंबरनाथमधूनही शिंदे गटाला पाठिंबा वाढला
अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील -21 नगरसेवक/नगरसेविका 2 स्वीकृत नगरसेवक यांनी कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पूर्ण पाठिंबा, तसेच त्यांचा समवेत शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी देखील सामील होत समर्थन दर्शविले आहे.
-
शिवसेनेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे धाव
आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नका
धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका
-
सेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई कोरोना पॉझिटिव्ह
– मुंबईतल्या घरी होम आयसोलेशन असल्याची देसाई यांची माहिती,
– प्रकृती ठीक असून काळजी करण्याचं कारण नसल्याचं देसाई यांनी सांगितलं
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गडचिरोलीला जाणार
देवेंद्र फडणवीस मंत्रालयातून रवाना
पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेणार
दुपारची MMRDA ची बैठक रद्द
-
शिवसेनेच्या एकूण 19 लोकसभा खासदारांपैकी 12 खासदार बैठकीला उपस्थित तर 7 खासदार अनुपस्थित
उपस्थित खासदार
- गजानन कीर्तिकर
- अरविंद सावंत
- विनायक राऊत
- हेमंत गोडसे
- धैर्यशील माने
- प्रताप जाधव
- सदाशिव लोखंडे
- राहुल शेवाळे
- श्रीरंग बारणे
- राजन विचारे
- ओमराजे निंबाळकर
- राजेंद्र गावीत
शिवसेनेचे अनुपस्थित खासदार
- यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
- परभणी – संजय जाधव
- कोल्हापूर – संजय मंडलिक
- हिंगोली – हेमंत पाटील
- कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे
- रामटेक – कृपाल तुमाने
- दादरा-नगर हवेली – कलाबेन डेलकर
राज्यसभा खासदार उपस्थित
- संजय राऊत
- प्रियंका चतुर्वेदी
अनिल देसाई (दिल्लीला आहेत)
-
18 जुलै पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन
अधिवेशनात केंद्र सरकारला काँग्रेस घेरणार
अग्निपथ योजना, एम एस पी , बेरोजगारी , महागाई, चीन बॉर्डर
या मुद्द्यांवर काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल करणार
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती
-
बंडखोर आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
सुप्रीम कोर्टानं आम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. आमच्या बाजूनं हा निर्णय होणार असा आम्हाला विश्वास आहे. तसेच अरविंद सावंताचा विश्वास कोर्टावर नाहीतर कोर्टात का गेले? खासदारांना शिंदे साहेबांचा निर्णय पटला आहे, ते आमच्यासोबत येतील, तसेच हा मुद्दा एकनाथ शिंदे हाताळत आहेत, अशी प्रतिक्रिया बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून पुन्हा एक्शन मोडमध्ये
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर उद्यापासून पुन्हा एक्शन मोडमध्ये येताना दिसणार आहेत. राज ठाकरे उद्या कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. गेल्या काही दिवसात आधी कोरोना आणि नंतर शस्त्रक्रिया यासाठी राज ठाकरे हे रुग्णालयात होते.
-
अमरावतीच्या पालकमंत्री पदावरुन भाजप व शिंदे गटात रस्सीखेच होण्याची शक्यता
अमरावती जिल्ह्याला भाजपचाच पालकमंत्री मिळावा यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते आग्रही.
बच्चू कडू यांनीही केली होती अमरावतीच्या पालकमंत्री पदाची मागणी..
आमदार रवी राणाही लावत आहेत पालकमंत्री पदासाठी फिल्डिंग
जिल्हात पक्ष वाढवण्याकरता भाजपचा पालकमंत्री व्हावा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे भाजपची गळ
सुत्रांची टिव्ही 9 मराठीला महीती
-
नाशिक – नरहरी झिरवळ काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देखील झिरवळ यांच्याशी संपर्क नाही
झिरवाळ नॉट रीचेबल झाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील भरली धडकी
-
महेंद्र थोरवे यांनी घेतली अमित ठाकरे यांची भेट
कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान दौऱ्यावर असलेले अमित ठाकरे यांची भेट घेतली, अमित ठाकरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दोघांमध्ये सुमारे 20 मिनिटं सध्याच्या राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा झाली.
भेटीचा फोटो चर्चेत
-
भाजप नेते प्रवीण दरेकर Live
पक्षात असे चढउतार येत असता. पक्षाला बांधण्यासाठी अशा यात्रा काढणे स्वाभाविक आहे. मात्र वेळीच कार्यकर्त्यांची काळजी घेतल्यास अशी वेळ येत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने ती काळजी घ्यावी. संजय राऊतांच्या वक्तव्याला कोणत्याही प्रकारचा मागमूस नाही. कुठे काहीही विधान करतात. बेताल बोलत राहतात. अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
-
शिंदे गटातील आमदारांनी घेतली अमित ठाकरेंची भेट
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भेटीला शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे भेटीलाकर्जत खालापूरचे आमदार श्री. महेंद्र थोरवे यांनी आज मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान दौऱ्यावर असलेले श्री. अमितसाहेब ठाकरे यांची भेट घेतली, अमितसाहेब ठाकरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दोघांमध्ये सुमारे २० मिनिटं सध्याच्या राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा झाली. -
शिवसेनेचे आठ खासदार मातोश्रीवर दाखल झाले
मातोश्रीवर फक्त आठ खासदार दाखल झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत खासदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आज बारा वाजता खासदारांची बैठक होणार आहे. आत्तापर्यंत आठ खासदार फक्त बैठकीला दाखल झाले आहेत.
-
निकाल मी वाचलेला नाही त्यामुळं मी न्यायालयीन प्रक्रियेवर सध्या बोलणार नाही – शरद पवार
- शरद पवार यांनी पुन्हा केला पाथरवट कवितेचा उल्लेख जवाहर राठोड या कवींची कविता, दगडापासून मूर्ती आम्ही बनवला, ती वाजता गाजत तुम्ही मंदिरात नेली आणि आम्हालाच मागासवर्गीय म्हणून आम्हाला दूर केलं,
- वसंतराव नाईक यांच्या सोबत काम केलं माझ्या अंतकरणात दोन लोकांच्या आठवणी कोरल्या गेल्या आहेत, पण यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची आठवण आहे
- मला तिकीट देताना आमच्या जिल्ह्यातील नेते विरोध करत होते 25- 26 वय असेल इतक्या लहान मुलाला तिकीट देऊ नका म्हणून वसंतराव नाईक यांच्याकडे गेले तेंव्हा वसंतराव नाईक म्हणाले 288 जागा त्यातील किती निवडून येतील? तर 180 किंवा 190 येतील मग वसंतराव म्हणाले की मग 80 ते 90 जागा पडतील तर त्यातील आणखी एक जागा पडेल म्हणून मला तिकीट दिलं आणि मी निवडून आलो आणि मला त्यावेळी राज्यमंत्री पद दिलं, म्हणून वसंतराव यांचा मी उल्लेख करतो
-
निकाल मी वाचलेला नाही त्यामुळं मी न्यायालयीन प्रक्रियेवर सध्या बोलणार नाही – शरद पवार
निकाल मी वाचलेला नाही त्यामुळं मी न्यायालयीन प्रक्रियेवर सध्या बोलणार नाही – शरद पवार
-
जे घटनेला मान्य आहे, त्यानुसार निर्णय होईल – संजय राऊत
जे घटनेला मान्य आहे, त्यानुसार निर्णय होईल
मी कोणताही कमेंट करणार नाही
घटनेची कोणतीही पायमल्ली होणार नाही
आमची बाजू भक्कम आहे, कायदेशीरदृष्ट्या मजबूत आहे
घटनेची कोणतीही पायमल्ली झालेली नाही.
जो निर्णय व्हायचा आहे, तो होईल…
-
आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकललीय, हा कुणालाही दिलासा नाही
– आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकललीय, हा कुणालाही दिलासा नाही– शिवसेना गट आणि शिंदे सरकरालाही सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही– सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या याचिकेवर खंडपीठात सुनावणी होणार असल्याचं सांगीतलंय– त्यामुळे शिंदे सरकारचं भविष्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे -
नरहरी झिरवाळ काल संध्याकाळ पासून नॉट रीचेबल .
नरहरी झिरवाळ काल संध्याकाळ पासून नॉट रीचेबल ..
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देखील झिरवाळ यांच्याशी संपर्क नाही
झिरवळांच्या चालक आणि सहाय्यक यांना देख झिरवळांचा पत्ता नाही..
राज्यात राजकीय भूकंप असताना विधानसभा उपाध्यक्ष मात्र ‘नॉट रीचेबल’
झिरवाळ नॉट रीचेबल झाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील भरली धडकी
-
हा विषय आता घटनापीठाकडे पाठवायला हवा – उल्हास बापट
हा विषय आता घटनापीठाकडे पाठवायला हवा
सुप्रीम कोर्टाने आत्ता जो निर्णय दिलाय तो बंधनकारक आहे
या सगळ्याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही
पण असे विषय लवकर मार्गी लावले जावेत अशी अपेक्षा आहे
राज्यपाल, सभागृहाचे अध्यक्ष यांनी अंपायर म्हणून भूमिका पार पाडणे आवश्यक आहे
-
राज्यात ईडीचा धाक दाखवला जातो आम्हाला ही दाखवला गेला, मात्र हललो नाही यापुढे ही हलणार नाही
शिंदे गडात गेलो तर पुन्हा मंत्री झालो असतो
मात्र वेळ प्रसंगी ज्यांनी साथ दिली त्यांना सोडणे योग्य नाही
शंकरराव आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही अडीच वर्षात जे काम केलं
मात्र आता सर्व कामांना ब्रेक लागला, वेळ काय कोणाबरोबर राहत नाही
राजकारण बद्दलत असत , मात्र आपण आपलं स्तिर राहिलेलं बरं
या तालुक्यात विरोधात जे वागले ते अतिशय हलकटपणाने वागले
दुःखात सोबत उभे राहीचे असते मात्र तुम्ही कोर्टात गेले
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचं नाव न घेता टीका
मला पण विरोध झाला होता मात्र इतक्या टोकाचा विरोध कधी झाला नव्हता
-
Anant kalse : खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागणार, सुप्रीम कोर्टाची माहिती, अनंत कळसे यांची प्रतिक्रिया
आजच्या सुनावणीत खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागणार असं न्यायालयाने सांगितले आहे
-
Anil Parab | ‘अध्यक्षांच्या अधिकारांवर कोर्टाने बंदी घातली आहे’
आज सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते
-
Anil Parab | सुनावणी दरम्यान शिंदे गटाला दिलासा
-
अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला.
Special CBI Court rejects default bail application filed by Maharashtra’s former Home Minister Anil Deshmukh, in a corruption case
— ANI (@ANI) July 11, 2022
-
आतातरी उद्धव ठाकरे यांनी जनमताचा कौल ओळखावा – आ. चंद्रशेखर बावनकुळे
“ज्या दिवशी सभागृहात शिंदे – फडणवीस सरकारला मोठं बहुमत मिळालं, त्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाने आपल्या सर्व याचिका मागे घ्यायला हव्या होत्या, आज सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला दिलासा दिलाय. आतातरी उद्धव ठाकरे यांनी जनमताचा कौल ओळखावा आणि याचीका मागे घ्यावी” अशी मागणी केलीय, भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी.बाईट – आ. चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री -
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या आमदार निलंबनाच्या अधिकारांवर बंदी घातली
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या आमदार निलंबनाच्या अधिकारांवर बंदी घातली आहे, काल एक एफिडेविड फाईल करण्यात आले आहेत, त्यातून विधानसभा अध्यक्षांना निलंबनाचे अधिकार आहे, असा दावा करण्यात आला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने यावर स्टे दिलायनं आता कोर्ट संपूर्ण प्रकरण ऐकून घेईन आणि त्यानंतर पुढील निर्णय घटनापीठ ऐकून घेऊन निर्णय देईल…
-
खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागणार
सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य
हा निर्णय़ लँन्डमार्क निर्णय ठरेल
केस जटील असल्यानं घटनापीठ योग्य निर्णय घेईल
अपात्रतेचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार अध्यक्षांना
अंतिम सुनावणी होईपर्यंत आमदारांचं निलंबन टळलं
-
शरद पवारांची बैठक बोलावली आहे
आताची जी राष्ट्रपती पदाची निवडणुक होणार आहे. त्याबाबत बैठक होणार आहे. शरद पवारांनी आम्हाला निमंत्रण दिलं आहे.
-
परभणीचे खासदार संजय जाधव पंढरपूर येथे आहेत
परभणीचे खासदार संजय जाधव पंढरपूर येथे आहेत,
जाधव आज मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी अनुपस्थित राहणार ,
आणि त्यांनी तसे वरिष्ठाना कळवले असून ते मुंबईला न जाता शक्यतो परभणीला येणार आहेत
-
ही प्रक्रिया अशीचं सुरु राहिली तरी सुध्दा मुख्यमंत्र्यांची एक टर्म पुर्ण होईल
ही प्रक्रिया अशीचं सुरु राहिली तरी सुध्दा मुख्यमंत्र्यांची एक टर्म पुर्ण होईल
आता कोणत्याही आमदारांचं निलंबन होणार नाही
मा. सर्वोच्छ न्यायालयात कबिल सिब्बल यांनी मागणी केली होती.
ती कोर्टाने फेटाळली आहे
जो पर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी पुर्ण होत नाही. तोपर्यंत कोणतीही कारवाई होणार नाही – वकील
-
शिवसेनेच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे
शिवसेनेच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे
यामध्ये बराचसा वेळ जाऊ शकतो
सुनावणी पुर्ण होईपर्यंत आमदारांचं निलंबन नाही
खंडपीठ नेमण्यासाठी वेळ लागणार
-
महाराष्ट्राबाबतच्या याचिकेवर आजच सुनावणी व्हावी,कपिल सिब्बल यांची कोर्टात मागणी
महाराष्ट्र बाबतच्या याचिकेवर आजच सुनावणी व्हावी
कपिल सिब्बल यांची कोर्टात मागणी
16 आमदार निलंबन बाबत याचिका कोर्टात मेंशन
-
सर्वोच्छ न्यायालयात सुनावणीला सुरूवात
[Maharashtra Crisis]
Senior Advocate Kapil Sibal appearing for Uddhav Thackrey faction requests bench led by CJI NV Ramana to list petitions related to #MaharashtraPoliticalCrisis
Sibal: Disqualicaiton petitions are listed tom. It was listed on 27th. pic.twitter.com/C8rWT36kLC
— Live Law (@LiveLawIndia) July 11, 2022
-
महाराष्ट्र बाबतच्या याचिकेवर आजच सुनावणी व्हावी
महाराष्ट्र बाबतच्या याचिकेवर आजच सुनावणी व्हावी
कपिल सिब्बल यांची कोर्टात मागणी
16 आमदार निलंबन बाबत याचिका कोर्टात मेंशन
-
पंकजा मुंडे यांना शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान द्या; मुंडे समर्थकांचे वैद्यनाथाला साकडे
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळात स्थान मिळावं. या मागणी करीता मुंडे समर्थकांनी परळीच्या वैजनाथ मंदिरात अभिषेक घालत साकडे घातले आहे. याआधी भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नव्हत. तेव्हापासून अद्याप मुंडे समर्थक नाराज आहेत. त्यानंतर विधानपरिषद देखील पंकजा मुंडे यांची संधी हुकली, त्यामुळे किमान आता शिंदे आणि फडणवीस सरकार मध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात सामावून घेण्यात यावे अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रभू वैद्यनाथाला साकडे घातले आहे. -
यशवंतराव चव्हाण यांची संपत्ती काय तर त्यांच्या खात्यात फक्त 7 हजार रुपये शिल्लक होते
यशवंतराव चव्हाण यांची संपत्ती काय तर त्यांच्या खात्यात फक्त 7 हजार रुपये शिल्लक होते आणि तब्बल 14 हजार ग्रंथ त्यांच्याकडे होते, 7 हजार रुपये त्यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून वापरावेत असं मृत्युपत्रात सांगितलं तर 14 हजार ग्रंथांचं ग्रंथालय व्हावे अशी इच्छा व्यक्त केली
-
गोव्यात काँग्रेसचे एकूण 11 आमदार
गोव्यात काँग्रेसचे एकूण 11 आमदार
भाजपच्या वाटेवर असलेले 5 काँग्रेस आमदार
मायकल लोबो ( विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी)
केदार नाईक
राजेश फळदेसाई
हिलायला लोबो
दिगंबर कामत (कारवाई होणार)
काल पत्रकार परिषदेला उपस्थित 5 काँग्रेस आमदार
संकल्प आमोणकर एल्टन डिकॉस्टा युरी आलेमांव कारलुस फरेरा रुडोल्फ फर्नांडिस
-
गडाख काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे
अहमदनगरला ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील माजी जलसंधारण मंत्री यांनी आज नेवासा येथील सोनईत मेळावा आयोजित केला आहे. मला तुमच्याशी बोलायचंय अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शंकरराव गडाख यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली होती. त्यानंतर गडाख यांचा आज नेवासा येथील सोनईत मेळावा होणार आहेय. गडाख काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहेय. गडाख हे शिवसेनेकडून जलसंधारण मंत्री होते. ते नेवासा तालुक्यातुन अपक्ष निवडून आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्याचा हा पहिलाच मेळावा होत आहे या मेळाव्याची गडाख यांनी जय्यत केली आहे.
-
राजकीय पेच असलेली याचिका कोर्टात लिस्ट
- राजकीय पेच असलेली याचिका कोर्टात लिस्ट
- जस्टीस पारडीवाला आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार ?
- आजच्या सुनावणी कडे राज्याच लक्ष
-
मी काढण्याचा अधिकार कोणाालाही नाही – बांगर
मी काढण्याचा अधिकार कोणाालाही नाही. मी या पदावर राहणार आहे. कुणालाही पदावरून काढण्याचा अधिकार नाही. तसेच मी हे मानत नाही. उद्धव साहेब यांना चुकीच्या लोकांचं ऐकू नये असा सल्ला देतो
-
सर्वोच्छ न्यायालयावरती आमचा विश्वास आहे – संजय राऊत
आज देशात लोकशाही आहे की नाही याकडे आम्ही पाहतोय
निकाल आमच्या बाजूने लागेल अशी देखील वक्तव्ये केली जात आहेत
म्हणून आम्ही अपक्षेने न्यायालयाकडे पाहतोय
महाराष्ट्रात जी काय सरकार स्थापन झाली आहे. ती अनधिकृत आहे…
हे संविधानिक सरकार नाही
या देशात संविधान कायदा आहे की नाही हे आज स्पष्ट होईल
सर्वोच्छ न्यायालयावरती आमचा विश्वास आहे.
-
शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष पदावरून काढल मी हे मान्य करत नाही
शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष पदावरून काढल मी हे मान्य करत नाही
मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे मिच शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहणार आमदार संतोष बांगर यांची tv9 मराठी ला माहिती
-
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन
बालगंर्धव रंगमंदिराजवळील झाशीच्या राणी पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन
मोदी सरकारने केलेल्या अन्यायकारक 50 रुपये गॅस दरवाढीविरोधात व जेवणाच्या ताटात असणा-या जवळ जवळ सर्व गोष्टींवर 5 % जी स टी लावून सर्वसामान्यांचे जिवन दुर्दर करणा-या व नुकत्याच सत्तेवर आलेल्या ED सरकारच्या वीजदर वाढीविरोघात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महागाई विरोधात तीव्र आंदोलन
-
आजच्या निकालाच्या अनुशंगाने संजय राऊतांचं ट्विट
आजच्या निकालाच्या अनुशंगाने संजय राऊतांचं ट्विट
The question is not about the survival of Shinde govt… the larger question is about the survival of Democracy…
It’s also a big test for the ‘free and fair’ Judiciary….!@LiveLawIndia @PMOIndia @priyankagandhi @MamataOfficial @indSupremeCourt @PawarSpeaks @ pic.twitter.com/gMQNl2N6Ca
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 11, 2022
-
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे घेतायेत “फिटनेस”चे धडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे त्यांच्या भाषण शैली बरोबरच फिटनेसमुळे देखील नेहमीच चर्चेत असतात. आता आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळातून विश्रांती मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. परळीतील एका जिम मध्ये त्यांचा वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकारण सर्वश्रुत आहे. त्यामुळेच या दोघांची नेहमी चर्चा देखील होते. आता अशातच त्यांच्या या व्हिडिओ मुळे धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आलेत. परळी मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करत या धावपळीतून वेळ काढत त्यांनी आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले आहे.
-
आज कोर्टात काय होणार ? पाहा एका क्लिकवर
आज न्यायालयात सुनावणी दरम्यान काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे
-
मला तुमच्याशी बोलायचंय, सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
मला तुमच्याशी बोलायचंय, सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
गडाख यांचा आज नेवासा येथील सोनईत मेळावा
शंकरराव गडाख काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष
गडाख हे शिवसेनेकडून होते जलसंधारण मंत्री
गडाख नेवासा तालुक्यातुन अपक्ष निवडून आले आहे
-
शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार
शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार… भाजप खासदार रामदास तडस यांचा दावा… सेना खासदारांच्या नाराजी बाबत खासदार तडस यांचे शिर्डीत मोठे वक्तव्य… शिवसेना खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी… विकासासाठी जनतेने निवडून दिले मात्र विकास न झाल्याने नाराज… नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकासाठी सेनेचे १२ खासदार पाठिंबा देतील… शिर्डीत तैलिक महासभेच्या कार्यक्रमासाठी आले असता भाजप खासदार रामदास तडस यांचे मोठे वक्तव्य…
-
शालिनी ठाकरे यांची शिवसेनेवरती टीका, ट्वीट चर्चेत
शालिनी ठाकरे यांची शिवसेनेवरती टीका
बंडखोर आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग या चिमण्यानो परत फिरा रे….अशी आर्त हाक घालायची….. पक्ष सोडून गेलेल्यांच्या परतण्याचा विचार सुद्धा न करणारे एकमेव शिवतीर्थावरील एकच ठाकरे..राजसाहेब ठाकरे …..!!!!#गद्दार #आदित्यठाकरे #शिवतीर्थ #याचिमण्यांनो
— Shalini Thackeray (@ThakareShalini) July 11, 2022
-
आमदार संतोष बांगर शकडो कार्यकर्ते घेऊन आज मुंबई कडे होणार रवाना
हिंगोली- आमदार संतोष बांगर शकडो कार्यकर्ते घेऊन आज मुंबई कडे होणार रवाना
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्या साठी शकडो कार्यकर्ते घेऊन मुंबई कडे होणार रवाना
आज सायंकाळी 04 वाजता शासकीय विश्राम गृह हिंगोली येथून 10 लकझरी बसेस, अनेक चार चाकी गाड्यांने होणार रवाना
चलो मुंबई ,चलो मुंबई च्या पोस्ट केल्या व्हायरल
-
Shivsena Political Crisis | शिवसेना खासदारांची आज महत्वाची बैठक
शिवसेना खासदारांची आज खास बैठक आयोजित करण्यात आली आहे
-
Shivsena Political Crisis | शिंदे गटातील 16 आमदार निलंबनावरील सुनावणीवर अस्पष्टता
आज निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता
-
Santosh Bangar यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी
संतोष बांगर यांची हकालपट्टी केल्याचं त्यांना अजून त्यांना पत्र मिळालेलं नाही
पक्षविरोधी कारवायामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे
-
” तेव्हा लाज वाटली नव्हती का ” शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानाला भरत गोगावले यांचे उत्तर
स्लग : ” तेव्हा लाज वाटली नव्हती का ” शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानाला आ. भरत गोगावले यांचे उत्तर
दहिसर येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यांमध्ये भाषण करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधणा साधला होता. त्यांच्या या विधानाला शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रतोद आ. भरत गोगावले यांनी उत्तर दिले आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. मात्र सेना भाजप न करता आपणच असंगाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत उभद्र आघाडी केल्याची आठवण करून देत, आम्ही काही चुकीच केल नाही त्यामुळे लाज वाटण्याचा संबध येत नाही असे चोख प्रतीत्तर आ. गोगावले यांनी देत बाळासाहेबांच हिंदूत्व आम्ही सोडणार नाही असे ठणकावुन सांगितले आहे.
-
काँग्रेसने आपल्या 5 आमदारांना काल मध्यरात्री अज्ञात स्थळी हलवले
काँग्रेसने आपल्या 5 आमदारांना काल मध्यरात्री अज्ञात स्थळी हलवले
पक्षाचे आमदार फुटीचया मार्गावर असल्याने अध्यक्षा सोनिया गांधी यांनी खासदार मुकुल वासनिक यांना डॅमेज कंट्रोलसाठी गोव्यात पाठवले
आज सकाळी 11:30 वाजता गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार
-
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बोलावली खासदारांची बैठक
- उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बोलावली खासदारांची बैठक…
- – राज्यसभा, लोकसभेच्या खासदारांसोबत न्यायालयाच्या निर्णयाबरोबरच पुढील रणनीती आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत होणार चर्चा…
- दुपारी 12 नंतर मातोश्रीवर बैठक होणार असल्याची माहीती…
-
संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
संतोष बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. संतोष बांगर यांच्या त्यांच्याकडे पत्र गेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
-
आजच्या दिवसाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे
आजच्या दिवसाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पण आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. कारण आजच्या सुप्रीम कोर्टाच्या दैनंदिन कामकाजात सुनावणीचा उल्लेख नसल्याची माहिती मिळाली आहे.
-
16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण 40 आमदार आणि 10 सहयोगी आमदार फुटले. अशावेळी शिवसेनेकडून सुरुवातीला 12 आणि नंतर 4 अशा एकूण 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली. त्याबाबत 16 पिटीशनही दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर एकनाथ शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. 27 जून रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं 11 जुलैपर्यंत आमदारांवर कुठलीही कारवाई होऊ नये असा आदेश दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांना तो मोठा झटका मानला गेला.
-
Sanjay Raut : लोकशाही आहे की नाही ते कळेल
उद्या कळेल या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था योग्य आहे की नाही. या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. आमचा न्याय देवेतेवर पूर्ण विश्वास आहे. किती दबावाखाली न्याय व्यवस्थेचे काम चालू आहे, हे आम्हाला माहिती आहे. परंतु देशाला हे समजेल की, या देशाची न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. आम्हाला उद्या न्याय मिळेल, असे अपेक्षित आहे. – संजय राऊत, खासदार, शिवसेना
-
ajit pawar : शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
जितक्या वकिलांशी बोललो त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे तंतोतंत पालन केल्यास 16 आमदारांबाबत वेगळा निकाल लागेल, असे वाटते. शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे, असेदेखील आमचेही मत आहे – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
-
supream court : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेनेतली गटनेतेपदाची लढाई सुप्रीम कोर्टात दाखल झाली असून सोबतच 16 आमदारांच्या निलंबनासह शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या तक्रारीची याचिका देखील न्यायालयात आहे. यावर 11 तारखेला सुनावणी होणार आहे. ठाकरेंसोबत उरलेल्या गटाच्या व्हिपचे उल्लंघन झाल्याचे तत्कालीन पीठासीन अधिकारी नरहरी झिरवळ यांनी रेकॉर्डवर घेतले होते. तर त्यानंतर काही तासांत, नवे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या व्हिपचे उल्लंघन झाल्याचे रेकॉर्डवर घेतले. त्याआधारे विधिमंडळ सचिवांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याच प्रश्नावरही सुप्रीम कोर्टात सोमवार 11 जुलै रोजी खल होणार आहे.
-
Eknath shinde : बहुमत चाचणीवेळी व्हिपचे उल्लंघन केल्याचा परस्परविरोधी दावा केला होता
एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत उरलेले शिवसेना आमदार या सर्वांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली आहे. अपवाद फक्त आदित्य ठाकरे यांचा आहे. दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी आणि बहुमत चाचणीवेळी व्हिपचे उल्लंघन केल्याचा परस्परविरोधी दावा केला होता आणि त्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांकडे तक्रारी देखील केल्या होत्या. शिंदे गटाने आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केली नव्हती, त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आलेली नाही.
Published On - Jul 11,2022 6:37 AM