सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्हाला EVM नकोच, अजित पवार म्हणाले EVM बद्दल माझ्या मनात शंका नाही!

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी ईव्हीएमबाबत  एकाच दिवशी दोन वेगवेगळी विधानं केली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी “आम्हाला ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, पारदर्शकता हवी असेल तर evm नको” असं म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अजित पवार यांनी  “ईव्हीएमविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. […]

सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्हाला EVM नकोच, अजित पवार म्हणाले EVM बद्दल माझ्या मनात शंका नाही!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी ईव्हीएमबाबत  एकाच दिवशी दोन वेगवेगळी विधानं केली आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी “आम्हाला ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, पारदर्शकता हवी असेल तर evm नको” असं म्हटलं होतं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच अजित पवार यांनी  “ईव्हीएमविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेले नसते, पण काहींच्या मनात शंका आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत साशंकता व्यक्त केली होती. “ईव्हीएम मशिनचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. गुजरात आणि हैदराबादच्या काही लोकांनी माझ्यासमोर मशीन (EVM) ठेवली होती. त्यांनी मला बटण दाबण्यास सांगितलं. मी घड्याळासमोरचं बटण दाबलं, पण तिथे मत भाजपला गेल्याचं मी स्वत: पाहिलं. सगळ्याच मशीनमध्ये असं असेल हे मी म्हणत नाही. हे मी पाहिलेलं सांगतो, त्यामुळे मी त्याच्याबद्दलची काळजी व्यक्त केली”, असं शरद पवार म्हणाले होते.

त्यामुळे राष्ट्रवादीत EVM विरोधी भूमिका खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची आहे, तर अजित पवार मात्र शंका नसल्याचं म्हणत आहेत.

ईव्हीएमबद्दल शंका नाही – अजित पवार

ईव्हीएमविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही. ईव्हीएममध्ये दोष असता तर पाच राज्यात भाजप सरकार गेले नसते, पण काहींच्या मनात शंका आहे, असं अजित पवार म्हणाले.

मोदींचं ढगाचे,ईमेल,डिजिटल कॅमेरा विधान हास्यपद,ग्रामीण भागातील अडाणी लोकांना पण न पटणारे आहे, असा टोला अजित पवारांनी लगावला.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Evm विषयी शरद पवार यांनी घेतलेल्या संशयाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हाला ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, पारदर्शकता हवी असेल तर evm नको”

हे अटीचं सरकार : अजित पवार

हे सरकार अटीचे सरकार आहे. आरक्षणाला अट,चारा छावणीला अट, प्रवेशाला अट, प्रवेशाला अट यातून कोणाचंही भल होणार नाही, असं टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर सोडलं.

केवळ व्हिडीओ कॉन्फरसिंग करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर उतरावे लागेल.  मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी, मंत्री फिल्डवर जायला घाबरतात. कारण अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत. आचारसंहितेचा बाऊ करत आहेत. अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी परदेश दौऱ्यावर गेले आहेत, असा दावा अजित पवारांनी केला.

संबंधित बातम्या 

शरद पवार फिल्डवरचे नेते, दुष्काळावरुन सुप्रियांचा मुख्यमंत्र्यांना टोमणा   

तिथे भाजपचा उमेदवारच नव्हता, मग पवारांचं मत कमळाला कसं गेलं? : सुभाष देशमुख 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.