शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधून स्वतःचाच फोटो न्याहाळून पाहतात…

सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून दिली. (Supriya Sule Sharad Pawar Health Update)

शरद पवार जेव्हा हॉस्पिटलमधून स्वतःचाच फोटो न्याहाळून पाहतात...
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 9:07 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र रुग्णालयातही त्यांना स्वस्थ बसवत नाही, ते वर्तमानपत्र वाचण्याचं काम करतच असतात, असं सांगत शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काल एक फोटो शेअर केला होता. पेपरमध्ये छापून आलेला तोच फोटो पवार न्याहाळून पाहत असल्याचं नव्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. (Supriya Sule shares Facebook Live Videos on Sharad Pawar Health Update watching his own Photo)

सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून दिली. या व्हिडीओतही शरद पवार रुग्णालयातील बेडवर बसून पेपर वाचताना दिसत आहेत. लाईव्ह सुरु झाल्यानंतर सुप्रिया सुळे दिसत नाहीत, मात्र त्यांचा आवाज ऐकू येतो. पवार स्वतःचा फोटो पाहत असताना ‘योगायोगाने हाच फोटो लावलाय’ असं सुळे म्हणाल्याचं ऐकू येतं. ‘एकदा गुड मॉर्निंग म्हणता का? सगळे बघतायत तुमच्याकडे’ अशी विचारणाही सुप्रिया सुळे यांनी केली. तेव्हा पवारांनी सर्वांना हलकेसे स्माईल दिले. दरम्यानच्या काळात सुप्रिया सुळेंनी ब्रिच कँडीमध्ये शरद पवारांना दाखल केलेल्या रुमची सैरही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांना घडवली.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.

सुप्रिया सुळेंकडून फोटो शेअर

(Supriya Sule shares Facebook Live Videos on Sharad Pawar Health Update watching his own Photo)

शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?

शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांनी थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती. आता शरद पवार यांची प्रकृती कशाप्रकारे सुधारते, यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी द्यायचा हे ठरवले जाईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट केला शरद पवारांचा फोटो, म्हणाल्या…

शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादीची सायबर पोलिसात तक्रार

(Supriya Sule shares Facebook Live Videos on Sharad Pawar Health Update watching his own Photo)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.