AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी डाएट करतेय’, मुख्यमंत्री बोलत असताना मध्येच सुप्रिया सुळेंचा आवाज, ‘सुप्रिया माईक सुरुय’, अजित पवारांकडून सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एका वेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं (Supriya Sule speak about Diet in Video Conference).

'मी डाएट करतेय', मुख्यमंत्री बोलत असताना मध्येच सुप्रिया सुळेंचा आवाज, 'सुप्रिया माईक सुरुय', अजित पवारांकडून सूचना
| Updated on: Aug 26, 2020 | 11:06 PM
Share

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचाच उपयोग करत आहेत. मात्र, आज (26 ऑगस्ट 2020) पुण्यातील कोव्हिड सेंटरचं उद्घाटन करत असताना त्यांना एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं (Supriya Sule speak about Diet in Video Conference). मुख्यमंत्री कोव्हिड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना मध्येच मी डाएट करतेय असा आवाज ऐकू आला आणि उद्धव ठाकरे तेथेच थांबले. यानंतर हा आवाज सुप्रिया सुळे यांचा असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. अजित पवार यांनीही सुप्रिया सुळे यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (26 ऑगस्ट 2020) पुण्यातील अण्णासाहेब मगर स्टेडियम (पिंपरी चिंचवड) येथील कोव्हिड सेंटरच उद्घाटन करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत होते. मात्र, ते बोलत असतानाच मध्येच ‘मी डाएट करतेय’ हा आवाज ऐकू आला आणि बैठकीतील सर्वचजण चकित झाले. हा आवाज दुसरा तिसरा कुणाचा नव्हता तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा होता. ही बाब लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ सुप्रिया सुळे यांना तुमचा माईक ऑन असल्याचं लक्षात आणून दिलं. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनीही ही गोष्ट सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून ते “सुप्रिया तुझा माईक ऑन आहे” असं सांगितलं.

यानंतर झालेला प्रकार लक्षात आल्यावर सुप्रिया सुळे यांनी तात्काळ ‘सॉरी, सॉरी, सॉरी’ म्हणत दिलगीरी व्यक्त केली. तसेच चुकीने मुख्यमंत्री बोलत असताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा माईक ऑन राहिल्याचं नमूद केलं. विशेष म्हणजे या प्रकारात मुख्यमंत्री आपला आधीचा मुद्दाही विसरल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांना मी कुठपर्यंत बोलत आलो होतो? हे विचारावं लागलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे या कॉन्फरन्सिंगमध्ये म्हणाले, “आधी पाऊस पडणार म्हटलं की ऊन यायचं आणि ऊन म्हटलं की पाऊस पडायचं, असे वेधशाळेचे अंदाज असायचे. आता मात्र यात खूप अंदाज खरे ठरतायेत. याच अंदाजाचा सामना करत आपण कोरोनाशी लढतोय. साथ आहे म्हटल्यावर पसरणार पण आपण गप्प बसणार नाही.”

यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना उद्देशून “दादा कोणी कितीही टीका करु द्या, मला त्याची पर्वा आणि चिंता नाही. आपण जनतेचे बांधिल आहोत. आपण आपली जबाबदारी पार पाडत राहुयात” असं मत व्यक्त केलं..

या कार्यक्रमाच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शाब्बास पुणेकर’ म्हणत पिंपरी चिंचवडमधील जंबो कोव्हिड केअर सेंटरचं उद्घाटन केलं. दरम्यान, रविवारी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील एका कोव्हिड सेंटरचं उद्घाटन करत कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी पुणेकरांची पाठ थोपटली होती.

हेही वाचा :

‘जिंतूर बाजार समितीचा प्रश्न मोठा नाही’, उद्धव ठाकरेंचा संजय जाधव यांना फोन, राजीनामा मागे घेण्याची सूचना

‘वार्षिक कर भरणाऱ्या वाहन मालकांना करमाफी’, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात

Supriya Sule speak about Diet in Video Conference

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.