रोहितला विधानसभेचं तिकीट देणार का? सुप्रिया सुळे म्हणतात…

पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून विधानसभा लढणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांना विधानसभेचं तिकीट देणार का, या प्रश्नाला अद्याप समाधानकारक उत्तर देण्यात आलं […]

रोहितला विधानसभेचं तिकीट देणार का? सुप्रिया सुळे म्हणतात...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. रोहित पवार कुठल्या मतदारसंघातून विधानसभा लढणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांना विधानसभेचं तिकीट देणार का, या प्रश्नाला अद्याप समाधानकारक उत्तर देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ‘टीव्ही 9 मराठी’ने थेट राष्ट्रवादीच्या खासदार आणि रोहित पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनाच यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट बोलण्यास उत्तर दिले नसले, तरी रोहित पवार यांना विधानसभेला उतरवण्यासंदर्भात नकारात्मक प्रतिक्रियाही दिली नाही. त्यामुळे रोहित पवार हे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता अधिक वाढली आहे.

रोहित पवार यांच्याबाबत प्रश्न आणि सुप्रिया सुळेंची उत्तरं

प्रश्न : रोहित पवार सध्या पवारसाहेबांसोबत दुष्काळी दौरे करत आहेत. साताऱ्यात सोबत होते, बीडमध्ये सोबत होते. त्यांनी (रोहित पवार) स्वत: सांगितलं की, मी विधानसभा लढवणार, तशी तयारी सुरु आहे. पक्ष म्हणून किंवा तुम्हाला काय वाटतं की, ज्या प्रकारे रोहित पवारांची वाटचाल सुरुय, विधानसभेसाठी रोहितला संधी दिली जाईल?

सुप्रिया सुळे : संधी कुणाला द्यायचा, तो अधिकार माझ्याकडे नाहीय. पण रोहित जर फिल्डवर जाऊन लोकांमध्ये काम करत असेल, तर ती आनंदाची गोष्ट आहे. आणि दुष्काळाच्या काळात, खडतर परिस्थिती असते, त्यावर मात करुन काम करायचं, हे प्रशिक्षण त्याला पवारसाहेबांकडून मिळतंय, ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. तो (रोहित पवार) एसीत स्लाईड्सवर दुष्काळ कसा असतो ते न पाहता, फिल्डवर जाऊन काय परिस्थिती आहे, हे पाहतोय. त्यामुळे एखादा युवक काहीतरी शिकू पाहतोय, कष्ट करु पाहतोय, तर मला माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

प्रश्न : त्यांना संधी मिळावी का?

सुप्रिया सुळे : ते पक्ष ठरवेल. त्यांनी (रोहित पवार) तिकीट मागितली तर पक्षाने तो निर्णय घ्यावा. तो पक्षाचा निर्णय असेल, ना माझा असेल ना रोहितचा असेल.

दरम्यान, अहमदनगरमधील जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. जामखेड भागात रोहित पवार यांनी सक्रीयपणे काम करण्यासही सुरुवात केली आहे.

कोण आहेत रोहित पवार?

रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे सहाजिक आहे. मात्र, पवारांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जाबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवारांमध्ये दिसून येते. शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे, त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते.

वाचा : रोहित राजेंद्र पवार… पवार घराण्यातील नव्या पिढीचा शिलेदार नेमका कोण?

वडिलांसोबत व्यवसायात उतरलेल्या रोहित पवारांनी पुढे आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून विविध कामांचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. या कामांची सोशल मीडियासह अनेक ठिकाणी चर्चा सुरु असते.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.