शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन भाषण, पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा गाजवली

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरुन सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या व्हर्च्युअल सभेची छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. | Supriya Sule Pandharpur Bypoll

शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं 'ब्रीच कँडी'च्या गेटवरुन भाषण, पंढरपूर पोटनिवडणुकीची सभा गाजवली
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 3:31 PM

मुंबई: एकीकडे शरद पवारांचं आजारपण आणि दुसरीकडे पंढरपूर विधानसभेची प्रतिष्ठेची पोटनिवडणूक अशा दुहेरी पेचात सापडलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वेळ पडल्यास एखादी स्त्री किती मल्टीटास्किंग होऊ शकते, याचा प्रत्यय आणून दिला. त्यांनी बुधवारी एक मुलगी आणि पक्षाची एक कार्यकर्ता या दोन्ही भूमिका अगदी चोखपणे पार पाडल्या. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आजारपणामुळे सुप्रिया सुळे यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून प्रचार करता आला नव्हता. मात्र, बुधवारी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेरुनच व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूरच्या मतदारांशी संवाद साधला. (NCP leader Supriya Sule virtual rally for Pandharpur Bypoll election)

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरुन सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या व्हर्च्युअल सभेची छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भालके नाना यांच्यासोबत आम्ही पंढरपूरचा चेहरामोहरा बदलायचे ठरवले होते. त्यामुळे भारत भालके आणि पंढरपूरासोबत आमचं एक वेगळं नातं होतं. मात्र, नाना अर्ध्या वाटेवर साथ सोडतील असं वाटलं नव्हतं. त्यामुळे आता विश्वासाच्या नात्याने ही जबाबदारी भगीरथ भालके यांच्यावर सोपविली आहे. आता आपण नानांची अधुरी स्वप्नं पूर्ण करु. त्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

अजित पवारांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले: पडळकर

सुप्रिया सुळे यांच्या सभेपूर्वी पंढरपुरात भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची सभा झाली. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत पवार कुटुंबीयांना लक्ष्य केले. शरद पवार यांचं अख्खं कुटुंब सध्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आलं आहे. मात्र, त्यांना या पंढरपूर-मंगळवेढाच्या निवडणुकीशी (Pandharpur Bypoll) काहीही देणघेणं नाही. त्यांचा डोळा हा विठ्ठल कारखान्यावर आहे. हा कारखाना त्यांना घशात घालायचा आहे. काही दिवसांपूर्वीच करारपत्र करुन आदिनाथ कारखाना पवारांच्या नातवाने घशात घातला. तर अजित पवार यांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले, असा घणाघाती आरोप पडळकर यांनी केला.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीचे नेते बाजार बुणगे, आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे, बलात्कारी; पडळकर, दरेकर बरसले

Maharashtra Lockdown | राज्यात संचारबंदी, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी नियम काय?

अजित पवारांनी राज्यातील 13 साखर कारखाने कवडीमोल भावाने घशात घातले; गोपीचंद पडळकरांचा घणाघाती आरोप

(NCP leader Supriya Sule virtual rally for Pandharpur Bypoll election)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.