‘..तर घरा-दारासकट सगळं सोडून जातो’, आमदार सुरेश धसांचं भ्रष्टाचाराच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर

आष्टीतील देवस्थान आणि इनामी जमिनीपैकी काही जमीन खोट्या कागदपत्राद्वारे धस यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपाला उत्तर देताना धस यांनी शिरुरमधील जाहीर सभेत आपल्या खास अंदाजात उत्तर दिलं.

'..तर घरा-दारासकट सगळं सोडून जातो', आमदार सुरेश धसांचं भ्रष्टाचाराच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर
सुरेश धस, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 4:39 PM

बीड : जिल्ह्यातील देवस्थान जमिनीचा घोटाळ्याच्या आरोपानंतर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी जोरदार टोलेबाजी केलीय. आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन या जमीन घोटाळ्याबाबत (Land scam) सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आष्टीतील देवस्थान आणि इनामी जमिनीपैकी काही जमीन खोट्या कागदपत्राद्वारे धस यांनी लाटल्याचा आरोप करण्यात आलाय. या आरोपाला उत्तर देताना धस यांनी शिरुरमधील जाहीर सभेत आपल्या खास अंदाजात उत्तर दिलं.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली होती. दादागिरी आम्हाला दाखवू नका. तुम्ही स्वर्गीय अण्णांना फसवून पुढे आलात. मी त्यांचा पुत्र आहे. नवाबभाई सध्या दोनच माणसांच्या मागे लागले आहेत. एक वानखेडे आणि दुसरे जमीन हडप करणारे, असं म्हणत मुंडे यांनी सुरेश धस यांचं नाव न घेता जोरदार टीका केली होती.

‘तुमचं सरकार आहे, मग करा चौकशी’

मुंडे यांच्या या टीकेला उत्तर देताना धस यांनी आपल्या अंदाजात प्रत्युत्तर दिलं. काय भाषण, काय बोलणं… शोभतं का? थोडं हिशेबात बोला. टीका-टिप्पणी करताना उगीच दुसऱ्याचा अपमान करायचा असं काहीही बोलायचं. तुमचं सरकार आहे, मग करा चौकशी, करा तपास, उगाच ढगात गोळ्या मारण्याचं काम करु नका, असं धस म्हणाले.

‘पन्नास कोटीच द्या, अख्खा जिल्हा सोडून जातो’

धस यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना विरोधकांना थेट आव्हान दिलंय. ‘औरंगाबादला पत्रकार परिषद घ्यायची. इकडे भ्रष्टाचार, तिकडे आमकं. माझ्याकडे हजार कोटींचा आकडा सांगितला. हजार कोटी म्हटल्यावर मी म्हटलं सगळं सोडून जातो’, असंही धस म्हणाले. त्याचबरोबर ‘मला हजार कोटी नको. मला पन्नास कोटीच द्या. माझ्या बाप-जाद्याची जी काही संपत्ती आहे, तुम्ही म्हणता मी कमावलेली आहे. ती घरादारासकट तुमच्या नावावर करुन देतो. अख्खा जिल्हा सोडून जातो. पन्नासच द्या, हजार कशाला’, असं उत्तर धस यांनी दिलंय.

धस यांच्याविरोधात नेमका आरोप काय?

देवस्थान आणि वक्फ बोर्ड यांच्या जमिनी या प्रकार दोन मध्ये येतात. या जमिनी कोणाच्याही नावावर होत नाहीत. या जमिनी देवस्थानच्या नावावर असतात किंवा त्यानंतर त्या सरकारी होतात. मात्र, सुरेश धस यांनी या जमिनीचा पद्धतशीर व्यवहार केला आहे. सुमारे 450 एकर जमीन त्यांनी बळकावली आहे. त्याचे बेकायदेशीर फेरफार केले आहेत. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

अमित शहांचा तो प्रयत्न मनोबल खचलेल्या भाजप कार्यकर्त्यांना सावरण्याचा; बाळासाहेब थोरातांचा खोचक टोला

अमित शहा म्हणाले, आघाडी सरकार महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देणार काय?; सुभाष देसाई म्हणतात, आमचे उद्योग पळवणं आधी बंद करा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.