Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा!

काँग्रेसचे दिग्गज नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांच्या यूपीए चेअरपदासाठी पाठिंबा दिलाय.

पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा!
sharad pawar
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 11:46 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीए अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी जो करिश्मा शरद पवारांनी केला तोच करिश्मा देशपातळीवर पवारांनी करावा, याचाच भाग म्हणून पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद जाणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्ट करत पवारांनी चर्चेतील हवा काढून घेतली. आता काँग्रेसचे दिग्गज नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांच्या यूपीए अध्यक्षपदापदासाठी पाठिंबा दिलाय. (SushilKumar Shinde support for Sharad Pawar UPA Chairperson)

“शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आजचा सोहळा म्हणजे सहस्त्रचंद्रदर्शनाचा हा सोहळा आहे. त्यांनी 50 वर्षांत अनेक चढ उतार बघितले. त्यांनी अनेक व्यक्तींसोबत काम केलं. त्यांचा अनुभव मोठा आहे. शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल”, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय.

“शरद पवार यांची स्मरणशक्ती प्रचंड आहे. अनेक लोकांना भेटल्यानंतर त्यांच्या नावासकट त्यांना ते लक्षात ठेवतात. पक्षातील कार्यकर्ता आणि नेता कुणालाही ते सहज उपलब्ध होतात. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता म्हणजे शरद पवार. पवारसाहेब आजही देशाचं नेतृत्व करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहेत. असा माणूस जर युपीएचा अध्यक्ष झाला तर मला नक्की आवडेल”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शुक्रवारी ट्विट करत पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चेपाठीमागे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान सुरु आहे त्याचाच भाग म्हणजे पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चा”, असं खळबळ उडवून देणारं ट्विट निरुपम यांनी केलं आहे. याच अभियानाच्या अंतर्गत 23 सह्यांचं पत्र लिहिलं गेलं होतं, असंही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“वारंवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामधल्या उणीवा दाखवण्याचं काम एक ठराविक वर्ग करतो आहे. काँग्रेस मिटवण्याचा एक मोठा प्लॅन चालू आहे”, असं मोठं विधान आपल्या ट्विटमधून संजय निरुपम यांनी केलं.

UPA च्या अध्यक्षपदासाठी माझ्या नावाच्या चर्चेत तथ्य नाही- शरद पवार

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. याच विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या दिवसभर माध्यमांधून देण्यात आल्या. मात्र UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले.

(SushilKumar Shinde support for Sharad Pawar UPA Chairperson)

संबंधित बातम्या

राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र? शरद पवारांचं नाव त्याचा भाग? वाचा सविस्तर

मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.