सुशीलकुमार शिंदे चुकून चुकले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचं नाव फोडलं!

सुशीलकुमार शिंदे हे गांधी घराण्याच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. त्यामुळे पक्षसंघटनेत त्यांना विशेष मान आहे. | Sushilkumar Shinde

सुशीलकुमार शिंदे चुकून चुकले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचं नाव फोडलं!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी साहजिकच त्यांना नव्या प्रदेशाध्यक्षाविषयी विचारण्यात आले. तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी अनावधानाने नाना पटोले यांचा उल्लेख आगामी प्रदेशाध्यक्ष असा केला.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 6:46 PM

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष (Congress President) कोण असणार, यावर बऱ्याच चर्चा सुरु आहेत. एव्हाना काँग्रेसमधील प्रत्येक गटाने हायकमांडने आपल्याच नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचेही सांगून झाले. मात्र, तरीही काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे. (Sushilkumar Shinde mistakenly told secret about congress party)

या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईत घडलेला एक किस्सा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी साहजिकच त्यांना नव्या प्रदेशाध्यक्षाविषयी विचारण्यात आले. तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी अनावधानाने नाना पटोले यांचा उल्लेख आगामी प्रदेशाध्यक्ष असा केला. मात्र, पक्षाकडून याबाबत अधिकृत घोषणा झाली नसल्याचे लक्षात येताच सुशील कुमार शिंदे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आगामी प्रदेशाध्यक्ष कोण येणार हे आपल्याला माहीत नाही. मात्र, प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात चांगलं काम करत असल्याचे सांगितले.

मात्र, त्यानंतर राजकीय वर्तुळात सुशीलकुमार शिंदे यांच्या या अनावधानाने झालेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. सुशीलकुमार शिंदे हे गांधी घराण्याच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. त्यामुळे पक्षसंघटनेत त्यांना विशेष मान आहे. या सगळ्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचं नाव ठाऊक असावे का, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नाना पटोलेंचे नाव का आघाडीवर?

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात येईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या:

प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्यास नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

महाराष्ट्रात ‘फायटर’ प्रदेशाध्यक्ष द्या; विजय वडेट्टीवारांची सोनिया गांधींकडे मागणी

विदर्भातील मंत्र्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद द्या, बाळू धानोरकरांची फील्डिंग कोणासाठी?

…तर पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, यशोमती ठाकूरांना विश्वास

(Sushilkumar Shinde mistakenly told secret about congress party)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.