आता माघार नाही! ‘तो’ व्हीडिओ दाखवत सुषमा अंधारे म्हणाल्या, “उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचंय…”

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राज्याच्या प्रमुखपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. त्या सोलापुरात बोलत होत्या. त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

आता माघार नाही! 'तो' व्हीडिओ दाखवत सुषमा अंधारे म्हणाल्या, उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचंय...
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 9:50 AM

सोलापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा राज्याच्या प्रमुखपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. सोलापुरातील जाहीर सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा व्हीडिओ दाखवला आणि उपस्थित शिवसैनिकांना आवाहन केलं.

“हा व्हीडिओ मी यासाठी दाखवला की उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाचं चित्र सर्व शिवसैनिकांच्या मनात साठलं पाहिजे. प्रत्येक शिवसैनिकाने एक गोष्ट लक्षात ठेवावी की, पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर, विधानभवनावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे आणि उद्धवसाहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं आहे”, असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणतात हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. यांचे सामान्य लोक म्हणजे कोण? तर सुभाष देशमुख, निलंगेकर, वगैरे वगैरे… देवेंद्रजींनी एका महिन्यात 15 लोकांना क्लिनचीट देवून क्लोजर रिपोर्ट कसा काय दिला? यावर आम्ही सरकारला प्रश्न विचारणारच, असं अंधारे म्हणाल्यात.

“मेरे प्यारे भाईयों, बहनों…”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मोदींची मिमिक्री केली आहे. शिवाय गुलाबराव पाटील यांचीही त्यांनी मिमिक्री केली.

ना खाऊंगा ना खाणे दूंगा बस नीरव मोदी, माल्ल्या को आधा दे दूंगा… काला धन वापस आया क्या?, असं म्हणत अंधारे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. अमित शहांच्या पकोडे दुकानाची आठवण करून दिली.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावरही अंधारे यांनी टीका केली आहे.

तानाजी सावंत हा आपला भाऊ आहे. त्याला खेकडा बिकडा म्हणू नका, असं म्हणत अंधारे यांनी सावंतांना डिवचलं आहे.

लोकसंख्या जास्त असली म्हणून ती विकासाला अडचण ठरत नाही. तसं असते तर चायना सर्वाधिक जास्त लोकसंख्या असुनही ती जगात पुढे आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.

मुलांनी जास्त विचार करु नये म्हणून डेली दीड जीबी डेटा दिला आहे. कॅगच्या अहवालात सांगितलंय, की एका महिन्यात 15 लाख नोकऱ्या गेल्या. याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हिंदू मुस्लिम भांडण लावत आहेत, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी सरकारवर केलाय.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.