AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanaji Sawant : ‘घरी बसेन पण भाजपमध्ये जाणार नाही’, शिवसेना आमदाराने स्पष्टच सांगितलं; उस्मानाबाद जिल्ह्यावर भगवा फडकावण्याचंही वचन

युती सरकारच्या काळात मंत्रीपद सांभाळल्यानंतर आता सक्रिय नसल्यामुळे, त्याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांशी खटके उडत असल्यामुळे तानाजी सावंत शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, सावंत यांनी तुर्तास तरी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

Tanaji Sawant : 'घरी बसेन पण भाजपमध्ये जाणार नाही', शिवसेना आमदाराने स्पष्टच सांगितलं; उस्मानाबाद जिल्ह्यावर भगवा फडकावण्याचंही वचन
तानाजी सावंत, आमदार, शिवसेनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 10:48 PM

उस्मानाबाद : माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) नाराज असल्याची चर्चा उस्मानाबाद जिल्ह्यात सुरु आहे. तानाजी सावंत शिवबंधन सोडून भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. अशावेळी स्वत: तानाजी सावंत यांनीच आपण शिवसेना (Shivsena) सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मी घरी बसेन पण दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेणार नाही, असं तानाजी सावंत म्हणालेत. ते आज उस्मानाबादमध्ये शिवसंपर्क अभियानावेळी बोलत होते. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये मंत्रिपदापासून डावलल्यानंतर तानाजी सावंत शिवसेनेपासून दुरावल्याचं पाहायला मिळत होतं. युती सरकारच्या काळात मंत्रीपद सांभाळल्यानंतर आता सक्रिय नसल्यामुळे, त्याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांशी खटके उडत असल्यामुळे तानाजी सावंत शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, सावंत यांनी तुर्तास तरी या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

जुन्या शिवसैनिकांचं काय? सावंतांचा सवाल

तानाजी सावंत यांना याबाबत विचारलं असता, कोण भाजप… मी भाजपमध्ये जाणार नाही. मी शिवसेना सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी घरी बसेन पण अन्य कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार नाही. शिवसेना माझ्या घरात, माझ्या मनात आहे. धाराशिव जिल्ह्यावर शिवसेनेचा भगवा फडकविणार हे वचन देतो, असं सावंत म्हणाले. तर जुन्या शिवसैनिकांचं काय? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक आणि तरुणांची बैठक बोलवावी. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना मान मिळायला हवा, अशी अपेक्षा सावंत यांनी यावेळी व्यक्त केलीय.

तानाजी सावंतांची फडणवीसांच्या भेटीसाठी अर्धा तास घुटमळ

तानाजी सावंत हे युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री राहिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. अशावेळी आज तानाजी सावंत यांची फडणवीसांच्या भेटीसाठी चांगलीच घुटमळ झाल्याचं हिवाळी अधिवेशना दरम्यान 22 डिसेंबर 2022 रोजी पाहायला मिळालं होतं. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीनंतर तानाजी सावंत यांनी फडणवीसांची धावती भेट घेतल्याचं चित्र विधानभवन परिसरात पाहायला मिळालं होतं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर सावंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. दरम्यान, स्वत:च्या साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन ही भेट झाल्याचं सावंतांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

पोरांनो ऑल द बेस्ट, उद्या लागणार 10 वीचा निकाल, 'या' लिंकवर बघा रिझल्ट
पोरांनो ऑल द बेस्ट, उद्या लागणार 10 वीचा निकाल, 'या' लिंकवर बघा रिझल्ट.
.. पण हीच योग्य वेळ, विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, काय म्हणाला?
.. पण हीच योग्य वेळ, विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, काय म्हणाला?.
भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात
भारत - पाकिस्तानमधल्या डिजीएमओंच्या चर्चेला सुरुवात.
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा
भारत-पाकच्या DGMOच्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा.
इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती
इस्त्रोचे 10 उपग्रह बनले लष्कराचे डोळे, दिली पाकच्या हालचालींची महिती.
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून, 6 दिवसांच्या प्रवासात कुठे फिरता येणार?.
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती
ऑपरेशन सिंदूरमध्ये 5 जवानांना वीरमरण; पत्रकार परिषदेत लष्कराची माहिती.
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?
भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला, सॅटेलाईटचे फोटो समोर, तुम्ही पाहिले?.
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च
बिकेसीमधल्या वाहतूक कोंडीवर तोडगा! सायकल ट्रॅक उखडायला 25 कोटी खर्च.
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.