‘बार्ज’मधील निष्पापांच्या मृत्यूला ONGC प्रशासन जबाबदार, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय.

'बार्ज'मधील निष्पापांच्या मृत्यूला ONGC प्रशासन जबाबदार, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
नवाब मलिक यांचा ONGC वर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 9:32 PM

मुंबई : ‘तोक्ते चक्रीवादळ समुद्र किनारपट्टीवर जोरदार प्रहार करणार हे संबधित यंत्रणेने सांगितलेले असतानाही ONGC ने सर्व सूचनांकडे का दुर्लक्ष केले? सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही?’ असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलाय. कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. दरम्यान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने याचं उत्तर द्यायला हवं असंही नवाब मलिक म्हणाले. (Minister Nawab Malik’s serious allegations against ONGC)

तौत्के चक्रीवादळाबद्दल प्रत्येकाला अवगत करण्यात आले होते आणि सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा इशाराही देण्यात आला होता. स्थानिक सरकारी एजन्सींनी किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची व्यवस्था केली होती आणि मच्छीमारांना समुद्रात जाऊ नका, असंही सांगण्यात आलं होतं. मग ONGC ने सर्व चेतावणींकडे दुर्लक्ष का केलं आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन का केले नाही? चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी त्यांनी सर्व कामगारांना बार्जमधून बाहेर का काढले नाही आणि किनार्‍यावर आणले नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती मलिक यांनी केलीय. ONGC मुळेच 60 निरपराध कामगारांचे जीव धोक्यात आले. या दुर्लक्षामुळे 60 लोक अजूनही बेपत्ता आहेत आणि बर्‍याच जणांनी आपला जीव गमावला, असा गंभीर आरोप मलिकांनी केलाय.

कारवाई करा, मलिकांची मागणी

बार्जवर प्रभारी होते त्यांनी योग्यवेळी स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला नाही अशा लोकांवर कारवाई करुन शिक्षा करण्यात यावी ,अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे. या बचाव कार्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दल रेस्क्यू ऑपरेशन करून कामगारांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

‘बार्ज पी- 305’ वरील 89 कर्मचारी गायब

बॉम्बे हाय फिल्डच्या परिसरातील ‘बार्ज पी- 305’ (Barge P305) वरून गायब असलेल्या 89 कर्मचाऱ्यांचा शोध अजूनही नौदलाकडून सुरुच आहे. या बार्जवर एकूण 273 कर्मचारी होते. यापैकी 184 जणांना नौदलाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून सुखरुप बाहेर काढले आहे. तर आतापर्यंत सहाजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप 89 कर्मचारी गायब असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे बॉम्बे हाय परिसरात असणारे ‘बार्ज पी- 305’ बुडाले होते. त्यामुळे या बार्जवरील सर्व कर्मचारी समुद्रात पडले होते. 17 तारखेलाच या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत 184 कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

Photo : INS कोची जहाजाला ‘तौक्ते’ने घेरलं, समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन, 14 मृतदेह सापडले; 184 जणांची सुटका

Video : तौत्के चक्रीवादळाच्या तांडवातून वाचलेले ‘मृत्यूंजय’! 24 तासापेक्षा अधिक काळ समुद्रात काढल्यानंतर वाचले प्राण

Minister Nawab Malik’s serious allegations against ONGC

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.