Hanuma Vihari | हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाला…

बाबुल सुप्रियो यांनी हनुमा विहारीच्या संथ खेळीवरून ट्विट करत टीका केली होती.

Hanuma Vihari | हनुमा विहारीचे भाजप खासदाराला सणसणीत प्रत्युत्तर, म्हणाला...
हनुमा विहारीने भाजप खासदार बाबुल सुप्रियोला प्रत्युत्तर दिलं आहे.
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 11:16 AM

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India) यांच्याकील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. हा सामना अनिर्णित राखण्यात हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रवीचंद्रन अश्विन या जोडीचे महत्वाचे योगदान राहिले. हनुमा विहारीने भाजप खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच अश्विननेही फिरकी घेतली आहे. हनुमाने बाबुल सुप्रियाच्या ट्विटला प्रत्युतर देत टोला लगावला आहे. (team india hanuma vihari critisized bjp mp babul supriyo)

सुप्रिया यांनी हनुमा विहारीवर संथ खेळीवरुन टीका केली होती. या ट्विटमध्ये सुप्रिया यांच्याकडून हनुमाचं आडनाव लिहिताना चुक केली. सु्प्रिया यांनी विहारीऐवजी बिहारी लिहिलं. यावरुन विहारीने सुप्रियो यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. तसेच हनुमाने सुप्रिया यांच्या ट्विटखाली आपलं अचूक नाव लिहित सणसणीत प्रत्युतर दिलं. या प्रत्युतराचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. तसेच अश्विनने हा स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया यांची फिरकी घेतली.

विहारीने दिलेलं प्रत्युत्तर

नक्की प्रकरण काय?

तिसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 300 पेक्षा अधिक धावांची आवश्यकता होती. पुजारा आणि पंत ही सेट जोडी बाद झाली. त्यामुळे अश्विन आणि विहारी या जोडीने सामना अनिर्णित करण्याच्या उद्देशाने खेळी केली. या दोघांनी कांगारुंना चांगलचं रडवलं. दोघांनी मैदानात घट्ट पाय रोवून झुंजार खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी पाचव्या दिवसखेर 259 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. यामध्ये हनुमा विहारीने 161 चेंडूत 23 धावा तर, रवीचंद्रन अश्विनने 128 चेंडूत 39 धावा केल्या.

सुप्रियोंनी विहारीच्या संथ खेळीवरुन ही टीका केली होती. “हा अत्याचार आहे. हनुमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही, तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. विजयाकडे पर्याय म्हणून न बघणे, मग तो कितीही दुरापास्त असू दे, असे करणे म्हणजे गुन्हा आहे”, असे सुप्रियो यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे. मात्र, “आपल्याला क्रिकेटमधील काहीही कळत नाही”, असी पुस्तीही खासदार महोदयांनी ट्विटमध्ये जोडली आहे.

बाबुल सुप्रियो यांच ट्विट

“जर हनुमा विहारीने खेळपट्टीवर फक्त उभे राहण्यापेक्षा वाईट चेंडूंवर चौकार मारले असते तर कदाचित भारताला ऐतिहासिक विजय मिळाला असता. कोणी अपेक्षा केली नव्हती, ते पंतने करुन दाखवले. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडूंवर चौकार ठोकायला पाहिजे होते”, असेही बाबुल सुप्रियो म्हणाले होते.

दरम्यान 4 सामन्यातील मालिकेत आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरीत आहे. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

तू क्रिकेटची हत्या केलीस; भाजपचे खासदार महाशय हनुमा विहारीवर भडकतात तेव्हा…

(team india hanuma vihari critisized bjp mp babul supriyo)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.