शिवसेनेत आता आदित्यसोबत तेजसही सक्रिय? नार्वेकर म्हणतात, एखादा स्फोटक हवाच !
नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असंही नार्वेकर यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर टीव्ही 9 मराठीशी बोलताना आदित्य आणि उद्धव ठाकरे हे संयमी आहेत. मात्र, कुटुंबात तेजससारखा एखादा स्फोटक असावाच, असं नार्वेकर म्हणाले.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तेजस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. या सगळ्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असंही नार्वेकर यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर टीव्ही 9 मराठीशी बोलताना आदित्य आणि उद्धव ठाकरे हे संयमी आहेत. मात्र, कुटुंबात तेजससारखा एखादा स्फोटक असावाच, असं नार्वेकर म्हणाले. (Aditya and Uddhav Thackeray are restrained, while Tejas Thackeray is aggressive)
सामनातील जाहिरात आणि ट्विटबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना मिलिंद नार्वेकर म्हणाले, “मी फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. तो माझा अधिकार नाही. त्यांचं कुटुंब आणि त्यांचा तो अधिकार आहे. विव्ह रिचर्ड्स यांच्या स्वभावावरुन तेजस यांना मी तसं म्हटलं आहे. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. कुटुंबातील एखादा व्यक्ती असा स्फोटक असावा. आदित्य, उद्धव ठाकरे हे संयमी आहेत. कुटुंबातील एखादा स्फोटक असावाच लागतो”.
‘ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्’
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकंच नाही तर ‘एक घाव दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे’ असं ट्वीटही नार्वेकर यांनी केलं आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) August 7, 2021
उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना विचारलेला पहिला प्रश्न
नार्वेकर यांनी 1994 मध्ये आपल्याला शाखाप्रमुख बनण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी तुला शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे? असा प्रश्न विचारला होता. नार्वेकर यांनी या ट्वीटमध्ये एक जुना फोटोही शेअर केला आहे.
तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली.
आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा?
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) July 26, 2021
संबंधित बातम्या :
तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक
Aditya and Uddhav Thackeray are restrained, while Tejas Thackeray is aggressive