महाविकासआघाडीच्या नव्या सरकारबाबत 10 विशेष गोष्टी

विधानसभा निवडणूक निकालानंतर तब्बल एक महिन्यानंतर राज्यात आज (28 नोव्हेंबर) सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून (Ten speciality of Thackeray government) शपथ घेतली.

महाविकासआघाडीच्या नव्या सरकारबाबत 10 विशेष गोष्टी
पाहा आणखी फोटो
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 11:27 PM

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर तब्बल एक महिन्यानंतर राज्यात आज (28 नोव्हेंबर) सरकार स्थापन झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून (Ten speciality of Thackeray government) शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर सहा नेत्यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या विरोधी विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन (Ten speciality of Thackeray government) करत आहेत. त्यामुळे सर्वत्रच या सरकारविषयी जोरदार चर्चा होत आहे.

विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र लढवली. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती न करता थेट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे पसंत केले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या (मविआ) या सरकारचे अनेक वेगळेपणही पाहायला मिळत आहे.

मविआ सरकारचं टॉप-10 वेगळंपण

1. उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्री

2. उद्धव ठाकरे हे आजवर एकही निवडणूक न लढवलेले पहिले मुख्यमंत्री

3. राज्याच्या इतिहासातील पहिले छायाचित्रकार मुख्यमंत्री

4. शिवतीर्थाच्या इतिहासातील दुसरा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा

5. गेल्या दहा वर्षात निकालानंतर जुळलेल्या आघाडीचं पहिलं सरकार

6. एकत्र लढलेले विरोधात, तर विरोधात लढलेले सत्तेत एकत्र असे पहिले सरकार

7. एकाच घराण्यातील पिता-पुत्र आणि चुलतभाऊ असे तीन राजकारणी शपथविधीच्या मंचावर

8. 1978 नंतर धर्मनिरपेक्ष-हिंदुत्ववादी-समाजवादी सर्व विचारांचं सरकार

9. 1978 प्रमाणे थेट नसले तरी सरकारमागचे सूत्रधार शरद पवारच

10. 1978 मध्ये पवारांना पुलोद सरकारस्थापनेसाठी तळवलकरांच्या अग्रलेखाचं निमित्त, आता संजय राऊतांचे अग्रलेख व प्रत्यक्ष सहभाग

दरम्यान, आज झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात रायगड किल्ल्याच्या संवर्धनसाठी 20 कोटी मंजूर करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांसाठी मोठी मदत करणार असल्याचंही आश्वसन मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.