‘मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?’, अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही एका इंग्रजी वेबसाईटचा हवाला देत भाजपवर आरोप केलाय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

'मिर्चीची सवय लागली असेल तर सामान्यांच्या कराच्या पैशाची चहा गोड कशी लागणार?', अतुल लोंढेंचा फडणवीसांचा टोला
अतुल लोंढे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 5:05 PM

मुंबई : राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या टेरर फंडिंगचा (Terror Funding) मुद्दाही चांगलाच गाजतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीही वाढताना दिसत आहेत. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनीही एका इंग्रजी वेबसाईटचा हवाला देत भाजपवर आरोप केलाय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.

‘प्रिय देवेंद्रजी, इक्बाल मिर्ची या मुंबई बाँब स्फोटातील अतिरेक्याशी संबंधित कंपन्यांकडून भाजपाला आलेल्या या डोनेशनबाबत आपण काही बोलणार आहात का? मिर्ची ची सवय लागली असेल तर सामान्य जनतेच्या कराच्या पैशाची चहा तुम्हाला गोड कशी लागेल?’ असा खोचक सवाल अतुल लोंढे यांनी फडणवीसांना विचारलाय.

नेमका प्रकार काय?

भारतीय जनता पार्टीने एका अशा कंपनीकडून मोठं डोनेशन घेतलं आहे, ज्या कंपनीची चौकशी सध्या अंमलबजावणी संचलनालयाकडून केली जातेय. या कंपनीशी दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्चीचा संबंध होता असं वृत्त ‘द वायर’ने दिलं आहे. या वृत्ताचा धागा पकडत अतुल लोंढे यांनी भाजपला खोचक टोला लगवालाय.

फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका आणि रोख स्पष्ट केला आहे. दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. देशद्रोह्यांशी संबंध हा सर्वात मोठा गुन्हा आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा बचाव करताना नाही जनाची तर किमान मनाची तरी… नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील, तर मग हेच म्हणावे लागेल की हे दाऊद इब्राहिमला समर्पित सरकार आहे. पण आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार, असं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

हे तर बेवड्यांना समर्पित सरकार, त्यांना शेतकरी नव्हे दारू उत्पादन करणारा जवळचा वाटतो- फडणवीसांचा घणाघात

कितीही गोंधळ घाला, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी अधिवेशनापूर्वीच ठणकावले

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.