पुन्हा राजकीय भूकंप?, ठाकरे गटाचे आमदार रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, बड्या खासदाराचा गौप्यस्फोट

ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री एकांतात भेटत असतात. हे अस्वस्थ आमदार सह्याद्रीवर येऊन भेटत असतात.

पुन्हा राजकीय भूकंप?, ठाकरे गटाचे आमदार रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, बड्या खासदाराचा गौप्यस्फोट
ठाकरे गटाला पुन्हा खिंडार?, ठाकरे गटाचे आमदार रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, बड्या खासदाराचा गौप्यस्फोटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 10:08 AM

मुंबई: शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटात फूट पडणार असल्याच्या वावड्या उठत असतात. ठाकरे गटातील काही आमदार (एमएलए) आणि खासदार (एमपी) नाराज असून ते केव्हाही शिंदे गटात किंवा भाजपमध्ये (बीजेपी) जाऊ शकतात, असंही सांगितलं जातं. मात्र, त्यामुळे ठाकरे गट फूटणार का? अशी चर्चा अधूनमधून होत असते. आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. ते रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटत असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदारच नाही तर अनेक खासदारही अस्वस्थ आहेत. त्यामुळे हे आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री अपरात्री भेट घेत आहेत, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर भाजपच्या मंत्र्यांनाही रात्री बेरात्री एकांतात भेटत असतात. हे अस्वस्थ आमदार सह्याद्रीवर येऊन भेटत असतात. मी स्वत: पाहिलं आहे. अनुभवलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या 40 आमदारांसह 10 अपक्ष अशा 50 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड केलं होतं. या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढला होता.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली.

भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. दुसरा विस्तार व्हायचा बाकी आहे. आमदारांबरोबर शिवसेनेच्या 12 खासदारांनीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.