ठाकरे कुटुंबाची सुरक्षा केंद्र सरकारची जबाबदारी – संजय राऊत

"वरळी डोम येथे उद्धव ठाकरे यांची काही कायदेपंडितांसोबत महापत्रकार परिषद आहे. तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. देशभरातील पत्रकारांना आम्ही निमंत्रित केलय" असं संजय राऊत म्हणाले.

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा केंद्र सरकारची जबाबदारी - संजय राऊत
sanjay raut Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 10:58 AM

मुंबई : “देवेंद्र फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्री नाहीत. त्यात वाटेकरी आहेत, त्यावर त्यांनी बोलावं. राम मंदिरासंदर्भात शिवसेनेच योगदान काय आहे? हे जगातल्या प्रत्येक हिंदूला माहित आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस गोधडीत रांगत होते. राम मंदिरावर तुम्ही शिवसेनेला काय प्रश्न विचारता? त्यांना प्रश्न विचारा, तुम्ही कुठे होता?” असं संजय राऊत म्हणाले. “डरपोक अयोध्येच मैदान सोडून पळून गेले. या पळपुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिराच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण ही संघनिती आहे, स्वत:ची नामर्दांनगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावर बोट ठेवण्यासारख आहे हा रामाचा अपमान आहे” असं संजय राऊत म्हणाले.

मातोश्रीबाहेर मोठा कांड होण्याची शक्यता असा फोन आलेला त्याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले की, “हे जे कोणी तरुण आहेत, काय आहेत, ते आम्हाला माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नाव धारण केली होती. लोकसभा निवडणुकीआधी धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणूक जिंकायची हे भाजपाच षडयंत्र आहे”

उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद कधी?

“ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्राच्या डाऊटफुल सरकारची नाही, ते सूडाने पेटलेले आहेत” असं संजय राऊत म्हणाले. “उद्या 4 वाजता वरळी डोम येथे उद्धव ठाकरे यांची काही कायदेपंडितांसोबत महापत्रकार पिरषद आहे. तिथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. देशभरातील पत्रकारांना आम्ही निमंत्रित केलय. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर तिथे चर्चा होईल” असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.