अवकाळीचा तडाखा अन् गारपिटीचा पाऊस, पण ठाकरे सरकार बळीराजाच्या पाठिशी, मदतीसाठी कटिबद्ध : शिवसेना
अवकाळीचा तडाखा अन् गारपिटीचा पाऊस सध्या महाराष्ट्रात पडलाय., पण ठाकरे सरकार बळीराजाच्या पाठिशी आहे. तसंच मदतीसाठीही कटिबद्ध आहे, असा विश्वास आजच्या सामना अग्रलेखातून राज्यातील बळीराजाला देण्यात आला आहे. | Saamana Editorial
मुंबई : निसर्गाची लहर मानवी नियंत्रणापलिकडेच आहे. मात्र निसर्गावर कोणाचे नियंत्रण नाही असे म्हणून हतबल होऊन कसे चालेल? कोरोना निर्बंध आणि अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा भक्कम हात देऊन उभे करावेच लागेल. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे, असा विश्वास आजच्या सामना अग्रलेखातून (Saamna Editorial) राज्यातील बळीराजाला देण्यात आला आहे. (Thackeray Government Support Farmer Over Unseasonal Rain Saamana Editorial)
कोरोनाची दुसरी लाट आणि पुनःपुन्हा बसणारा अवकाळीचा तडाखा अशा दुहेरी संकटांना सध्या महाराष्ट्र तोंड देत आहे. महाराष्ट्र या दोन्ही संकटांना तोंड देण्यास समर्थच आहे. सरकारचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोनाचे पुन्हा वर आलेले भूत नक्कीच परत गाडले जाईल, असंही अग्रलेखात म्हटलंय.
चार महिन्यांत तिसऱ्यांदा अवकाळीचा तडाखा
मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पाऊस, गारपीट याचा तडाखा बसत आहे. नेहमीप्रमाणे त्याचा फटका बळीराजालाच बसला आहे. गेल्या वर्षीपासून अवकाळी हे जणू नेहमीचे संकट झाले आहे. गेल्याच महिन्यात राज्याच्या मोठ्या भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता मार्चमध्ये परत त्याची पुनरावृत्ती झाली आहे. चार महिन्यांत तिसऱ्यांदा हा तडाखा बसला. म्हणजे अवकाळी आणि शेतातील उभ्या पिकाची नासाडी हे दर महिन्याचे संकट झाले आहे.
गहू, हरभरा, भाजीपाला, संत्र, द्राक्ष, आंबा, पपई, कलिंगड पिकांचं नुकसान
दोन-तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या संकटाने थैमान घातले आहे. त्यामुळे गहू, हरभरा, भाजीपाला, संत्र, द्राक्ष, आंबा, पपई, कलिंगड आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच द्राक्षाचे भाव पडले आहेत, त्यात अवकाळीच्या तडाख्याने आहे त्या द्राक्षबागांचे नुकसान केले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांवर पडेल त्या किमतीला द्राक्ष विकण्याची वेळ येऊ शकते. विदर्भातील संत्रा पिकाचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. यंदा संत्रा उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा होती. मात्र अवकाळीच्या लागोपाठ बसलेल्या तडाख्यांनी त्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने संत्राला गळती लागली आहे. गहू, हरभरा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ही दोन्ही पिके शेतातच मातीमोल झाली आहेत.
अवकाळीचा तडाखा आणि गारपिटीचा पाऊस, बळीराजाच्या उरल्यासुरल्या आशेवर
वर्षभराच्या कोरोना संकटानंतर ग्रामीण अर्थकारणही आता कुठे सुरळीत होत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ते परत विस्कळीत केले आहे. दैनंदिन भाजीविक्रीपासून छोट्या-मोठ्या व्यवसायापर्यंत सगळ्यांवरच निर्बंधाची कुऱ्हाड पडली आहे. त्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने बळीराजाच्या उरल्यासुरल्या आशेवर आणि उत्पादनावर पाणी फेरले आहे.
राज्य सरकार कटिबद्ध
कोरोनाची दुसरी लाट आणि पुनःपुन्हा बसणारा अवकाळीचा तडाखा अशा दुहेरी संकटाला सध्या महाराष्ट्र तोंड देत आहे. महाराष्ट्र या दोन्ही संकटांना तोंड देण्यास समर्थच आहे. कोरोना निर्बंध आणि अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा भक्कम हात देऊन उभे करावेच लागेल. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे.
(Thackeray Government Support Farmer Over Unseasonal Rain Saamana Editorial)
हे ही वाचा :
लेटरबॉम्ब नंतर दोन दिवसांनी गृहमंत्री घराबाहेर, अचानक अतिथीगृहावर, सह्याद्रीवर नेमकी काय खलबतं सुरु?
‘मी पुन्हा येईन’चं स्वप्न अजूनही जिवंत!, रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला