ठाण्यातील भाजप नगरसेवक विलास कांबळे यांचं निधन, हॉटेलमध्ये मृतदेह आढळला
हॉटेल व्यवस्थापनाला कांबळे यांच्या रुममधून दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यावेळी त्यांचा मृतदेह आढळला. (Thane BJP Corporator Vilas Kamble Dies)
ठाणे : ठाण्यातील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ठाण्यात एका हॉटेलमध्ये कांबळे यांचा मृतदेह आढळला. विलास कांबळे यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. (Thane BJP Corporator Vilas Kamble Dies)
विलास कांबळे गेल्या काही दिवसांपासून एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. कांबळे यांचे पार्थिव ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
हॉटेल व्यवस्थापनाला कांबळे यांच्या रुममधून दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यावेळी त्यांचा मृतदेह आढळला. हृदयविकाराच्या धक्क्याने कांबळे यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विलास कांबळे हे ठाणे महापालिकेत स्थायी समितीचे माजी सभापती होते. विलास कांबळे सुरुवातीला बसपमध्ये होते. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक 15 ड मधून ते नगरसेवकपदी निवडून आले. त्यांची पत्नी सुवर्णा कांबळेही ठाणे महापालिकेत नगरसेविका आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोना, कुटुंबातील चौघांना संसर्ग
दरम्यान, भाजप नेते निरंजन डावखरे यांनी ट्विटरवरुन विलास कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. “भाजपाचे ठाण्यातील नगरसेवक विलास कांबळे यांना विनम्र श्रद्धांजली. वागळे इस्टेट परिसरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने जागरूक होते. त्यांच्या निधनाने सामान्य जनतेचे नुकसान झाले. भावपूर्ण श्रद्धांजली” असं ट्वीट डावखरे यांनी केलं आहे.
भाजपाचे ठाण्यातील नगरसेवक विलास कांबळे यांना विनम्र श्रद्धांजली. वागळे इस्टेट परिसरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते सातत्याने जागरूक होते. त्यांच्या निधनाने सामान्य जनतेचे नुकसान झाले.भावपूर्ण श्रद्धांजली
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) May 29, 2020
(Thane BJP Corporator Vilas Kamble Dies)