TMC election 2022 : राष्ट्रवादी पुन्हा? ठाणे महापालिकेच्या 23व्या प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादी विजयाची पुनरावृत्ती करणार?
चार सदस्यीय प्रभाग रचनेत चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली होती. तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाला होता. यावेळी त्याची पुनरावृत्ती होते, की काही वेगळी गणिते पाहायला मिळतात, याची उत्सुकता आहे.
ठाणे : महानगरपालिकांच्या निवडणुकीचे हे वर्ष आहे. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. ठाणे महापालिका (TMC election 2022) ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची पालिका आहे. सध्या राज्यात सत्तांतर झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जे सध्या मुख्यमंत्री झालेत, ते यात जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतात. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. चार सदस्यीय प्रभागरचना मागील वेळी होती. एकूण 131 जागांपैकी तब्बल 67 जागा शिवसेनेकडे होत्या. यंदा तीन सदस्यीय प्रभागरचना आहे. आरक्षणही बदलले आहे. 47 प्रभागांमधील 142 जागांसाठी लढत होणार आहे. प्रभाग 23मध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले. चारपैकी तीन प्रभागांत राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारांची चलती होती. आता मागील वेळेप्रमाणे उमेदवार विजय मिळवतील का याची उत्सुकता आहे. दुसरीकडे शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. ठाण्यातील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार की शिंदे गटाचा, हेदेखील लवकरच समजणार आहे.
प्रभागातील व्याप्ती कशी?
प्रभाग क्रमांक 23 म्हणजे सी. पी. तलाव, नेहरू नगर, इंदिरा नगरचा काही भाग असा असून टीएमसी सार्वजनिक शौचालयापासून सुरू होतो. शंकर मंदिर, शंभूनाथ गुप्ता हाऊस, रुपादेवी पाडा, दत्त मंदिर, इंडिया नगर सर्कल, डी. मार्ट कॉर्पोरेट ऑफिस, केसरी निवास, गणेश कृपा सोसायटी, साधना सोसायटी, बर्वे रोड जंक्शन, पायल इंटरप्रायझेस, ऑटोकोट सिस्टीम, वागळे टीएमटी डेपो, दिलीप जैस्वाल हाऊस आदी महत्त्वाचे परिसर आहेत.
लोकसंख्येचे गणित
प्रभाग 23मधील एकूण लोकसंख्या 42,337 इतकी असून याच अनुसूचित जातीची लोकसंख्या 5757 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 709 इतकी आहे.
कोण मारणार बाजी?
चार सदस्यीय प्रभाग रचनेत चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली होती. तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाला होता. यावेळी त्याची पुनरावृत्ती होते, की काही वेगळी गणिते पाहायला मिळतात, याची उत्सुकता आहे.
विजयी उमेदवार (2017)
- मिलींद भारत पाटील – काँग्रेस
- अपर्णा मिलींद साळवी – राष्ट्रवादी
- केणी प्रमिला मुकुंद – राष्ट्रवादी
- केणी मुकुंद बाळू – राष्ट्रवादी
प्रभाग 23 (A)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 23 (B)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
प्रभाग 23 (C)
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजपा | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
आरक्षण कसे?
यावेळेला प्रभाग 23 मधील अ हा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर ब आणि क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.