आमची युती बघवत नाही, म्हणून लावालाव्या करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने विरोधकांना सुनावलं

Shrikant Shinde on Mahavikas Aghadi : आमच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न, पण...; श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना गर्भित इशारा

आमची युती बघवत नाही, म्हणून लावालाव्या करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने विरोधकांना सुनावलं
Follow us
| Updated on: Jun 17, 2023 | 2:28 PM

कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. “विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही. विरोधकांना एकच काम आहे, युतीत वितुष्ट कसं निर्माण होईल. यांच्यामध्ये लाव्यालावी कश्या करायच्या हेत त्यांचं ध्येय आहे, असं ते म्हणालेत. 19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यावरही श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलंय.

सर्व गोष्टी एकत्रित व्यवस्थितपणे चालू आहेत. चांगल्या प्रकारे चालू आहेत. हे विरोधकांना बघवत नाही. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी बोलून गोष्टी भडकवतात. पण आमच्यामध्ये सर्व गोष्टी चांगल्या चालू आहेत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यात विकास करण्याचं काम सुरू आहे. गेल्या 11 महिन्यात जेवढी विकासाची कामे झाली ती याच्या अगोदर कधी झाली नसेल. त्यामुळे कुणी काहीही केलं तरी आमची युती कायम आहे. त्यात काहीही फरक पडणार नाही, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

19 तारखेला शिवसेनेचा वर्धापन देण्याची तयारी आहे. त्यासाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील शिवसैनिक येतात. एक जंगी कार्यक्रम मोठा एक उत्साही कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडेल, असं म्हणत त्यांनी शिवसेना स्थापना दिवसावर भाष्य केलंय.

आम्ही सर्व लोक एकत्रच आहेत. रवींद्र चव्हाण यांचे वेगळे कार्यक्रम असतील हा कल्याण पूर्वेचा विषय आहे. या कार्यक्रमाला कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड त्यांचे सर्व नगरसेवक उपस्थित आहे. आमचेही पदाधिकारी उपस्थित आहेत, असं ते म्हणालेत.

सर्व काही चांगलं चाललेलं आहे. काही छोट्या-मोठ्या गोष्टी खालच्या स्तरावर होत असतात. ही युती वेगळ्या विचारधाराने आहे. विचारणारे झालेले युती एका वेगळ्या उद्देशाने झालेली युती छोट्याशा किरकोळ कारणामुळे त्यात कुठलाही वितुष्ट येणार नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.

लोकग्राम ब्रिज कल्याण पूर्वमधल्या जनतेसाठी महत्त्वाचा आहे. हा ब्रिज धोकादायक झाल्याने रेल्वे तोडलेला त्या जागेवर मोठा ब्रिज झाला पाहिजे. याचा आम्ही पाठपुरावा करत होतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून 78 कोटी या लोग्रमच्या ब्रिजला खर्च करणार आहे. भूमिपूजन या ठिकाणी होतेय. येणाऱ्या मार्च 2024 पर्यंत लोकांच्या सेवेमध्ये खुला होईल आणि लोकांना दिलासा मिळेल. कल्याण याड रिमोल्डिंग सारखा महत्वकांक्षी प्रकल्प 800 कोटींचा प्रकल्प होत आहे. त्याचा डीपीआर टेंडर सर्व प्रोसेस झालेली आहे. त्याचं काम लवकर सुरू होईल. यामुळे थेट गाडीने स्टेशनवर जाता येईल, असंही श्रीकांत शिंदे म्हणालेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.