Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विखे-थोरात वर्चस्वाची लढाई, लोकसभा, विधानसभेनंतर आता 12 गावात संघर्ष पेटणार

 लोकसभा, विधानसभा आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीतही थोरात-विखे असा संघर्ष पेटणार आहे.| Radhakrishna Vikhe patil VS balasaheb thorat Grampanchayat Election

विखे-थोरात वर्चस्वाची लढाई, लोकसभा, विधानसभेनंतर आता 12 गावात संघर्ष पेटणार
Follow us
| Updated on: Jan 06, 2021 | 8:19 PM

अहमदनगर : लोकसभा, विधानसभा आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीतही थोरात-विखे असा संघर्ष पेटणार असून संगमनेर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीमध्ये चुरस पहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील 14 गावे राधाकृष्ण विखे पाटलांच्या‌ शिर्डी मतदारसंघात येत असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये विखे समर्थक आणि थोरात समर्थकांमध्ये ‌ग्रामपंचायतीचा आखाडा रंगणार आहे. (The Election Battle between Radhakrishna Vikhe patil And balasaheb thorat Over Grampanchayat Election)

संगमनेर तालुक्यातील 14 गावे शिर्डी विधानसभा मतदार संघात जोडलेली आहेत. विधानसभेला या 14 गावातील मतदार शिर्डी विधानसभेसाठी मतदान करतात मात्र ग्रामपंचायतीला येथे थोरात-विखे संघर्ष पहायला मिळतो. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष नगर जिल्ह्यास नवा नाही. पण एका पक्षात असताना काही राजकीय तडजोडी होत असायच्या. मात्र आता थेट आमनेसामने हा संघर्ष होतोय.

विखे समर्थक निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त करत असले ‌तरी थोरात समर्थक मात्र या 14 गावातील ग्रामपंचायतीत थोरात गटाचीच सत्ता येणार, असा दावा करत आहेत. एकूणच दोन्ही पक्षांच्या वतीने विजयाचा दावा करण्यात येतोय.

मंत्री बाळासाहेब थोरातांनी मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत भाग घेत नसल्याच म्हटलंय. मी ३६ वर्षापासुन आमदार आहे. मी कधीच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही. गावातुनच एकत्र निवड करावी. मी कुठही भाग घेणार नाही, अस थोरात यांनी म्हटलंय. थोरात भाग घेत नाही अस जरी म्हणत असले तरी विखे आणि थोरात यांच्यातील ही चुरस प्रतिष्ठेची समजली जात आहे.

संगमनेरची राजकीय कुस्ती

तालुक्यातील एकुण ग्रामपंचायती – 143 निवडणुका होत असलेल्या एकुण ग्रामपंचायत – 94 बिनविरोध – 04 [ कॉग्रेस – थोरात यांच्याकडे ] एकमेव तिरंगी लढत – प्रतापपूर (विशेष म्हणजे प्रतापपूर येथे तीनही गट हे विखे समर्थक आहेत)

विखे-थोरात आमनेसामने लढत

चिंचपुर बुद्रुक, खळी, दाढ खुर्द, ओझर खुर्द, कनोली, चनेगाव, झरेकाठी, शेडगाव, प्रतापपूर, मनोली, प्रिंपीलौकी, आजमपुर, औरंगपुर, शिबलापुर, या 14 गावांमध्ये थेट विखे-थोरात लढत होणार आहे.

हे ही वाचा

Rekha Jare हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, बाळ बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी

औरंगाबादेतील गुंठेवारीची घरे नियमित होणार, चार लाख नागरिकांना दिलासा

कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.