चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला; उद्धव ठाकरे यांचा भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल

चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. तुम्ही का आला ते सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. एकच गोष्ट सांगेन.

चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला; उद्धव ठाकरे यांचा भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 3:01 PM

मुंबई : ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. त्यानंतर सेनाभवनात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू झाला आहे. तरीही तुम्ही माझ्याकडे आला आहात. तुम्ही का आला ते सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. एकच गोष्ट सांगेन. त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हं जरी चोरलं असलं तरी हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना (Shiv Sena) नाव चोरलं तरी ठाकरे हे नाव नाही चोरू शकत नाही. बाळासाहेब आणि माँच्या पोटी मी जन्माला आलो हे भाग्य आहे. ते भाग्य त्यांना मिळणार नाही. दिल्लीवाले त्यांना ते भाग्य देऊ शकत नाही. ते कितीही उतले मातले तरी करू शकत नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं.

ही परिस्थिती रोखली नाही तर…

देशातील कोणत्याही पक्षावर ते ही परिस्थिती आणू शकतात. आताच ही परिस्थिती रोखली नाही तर देशात कदाचित २०२४ ची निवडणूक शेवटची असेल. हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो, असा धोका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

घाई करण्याची गरज काय?

आयोगाचा निकाल आयोग्य आहे. घटनाक्रम जो घडला आहे. त्यानुसार निकाल अपेक्षित आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी उद्यापासून सुरू आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांनी निकाल देऊ नये अशी मागणी होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. दोन तृतियांश एका संख्येने गेले नाही. आधी १६ गेले. त्यांची केस सुरू आहे. त्यानंतर २३ जणांच्या अपात्रतेची केस सुरू आहे. टोटल मारली तरी दोन तृतियांशांना कोणत्या तरी पक्षात विसर्जित झाले पाहिजे. असं घटनेत म्हटलंय. त्या आधी आयोगाने घाई करण्याची गरज काय होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

म्हणून केंद्र सरकार बॅकफूटवर…

प्रशांत भूषण यांनी एक केस दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या नेमणुकीविरोधात आहे. आयोगाच्या आयुक्तांची नियुक्त होत असेल तर लोकशाहीचा गाभा धोक्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर सरकारने आक्षेप घेतला होता. त्यांना थेट न्यायाधीश नेमायचे होते. पण न्यायाधीश ठाम राहिल्याने केंद्र सरकार बॅकफूटवर गेले, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.