AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे आणि सेना गटाच्या अस्तित्वाचा फैसला लांबणीवर? सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा पुढे जाणार

एकनाथ शिंदे यांचे बंड, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेले सरकार याबाबत सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उद्या दिनांक २२ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार होती. मात्र आता ती सुनावणी उद्या होईल का, याची शक्यता कमी आहे.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिंदे आणि सेना गटाच्या अस्तित्वाचा फैसला लांबणीवर? सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा पुढे जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेImage Credit source: social
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 6:19 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत. आज म्हणजेच 22 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीची शक्यता कमी आहे. दुपारी सुनावणी होणाऱ्या यादीत समाविष्ट असणारी सुनावणी बदलण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील (Eknath Shinde) सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचलाय. एकनाथ शिंदे गटाला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेकडून 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आलीय. त्याबाबत 16 पिटिशनही सादर करण्यात आलेत. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

एकनाथ शिंदे यांचे बंड, आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेले सरकार याबाबत सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार होती. मात्र आता ती सुनावणी आज होईल का, याची शक्यता कमी आहे. तांत्रिक कारणामुळे ही सुनावणी आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दुपारी यादीत समाविष्ट असलेली सुनावणी बदलण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात देण्यात येईल अशी शक्यता आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde ) गटातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.  यापूर्वी दोन वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा ही सुनावणी पुढे जाण्याची शक्यता आहे. 12 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी  थेट 22 ऑगस्टला ठेवण्यात आली. मात्र, आता 22 ऑगस्टची सुनावणी देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. कारण सुनावणी होणाऱ्या यादीत समाविष्ट असणाऱ्या प्रकरणात बदल झाला आहे.

खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कुणाकडे जाणार यावर हा सुनावणीनंतर निर्णय होणार आहे. महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी  होत आहे. सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर उदय लळीत यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. यामुळे सुरुवाती पासून हे प्रकरण हाताळत असलेले सरन्यायाधीश रमणा  ही याचिका मार्गी लावतात की उदय लळीत यांच्याकडे हे प्रकरण जाते हे 22 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होणार होते. यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्यास नवीन सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याकडे याची सुनावणी जाऊ शकते

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.