शिंदे गटाच्या मंत्र्याचे ऑपरेशन सुरु असताना अचानक लाईट गेली आणि मग… सरकारी हॉस्पीटलमध्ये घडला भयानक प्रकार

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले.

शिंदे गटाच्या मंत्र्याचे ऑपरेशन सुरु असताना अचानक लाईट गेली आणि मग... सरकारी हॉस्पीटलमध्ये घडला भयानक प्रकार
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 10:14 PM

मुंबई : औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे मंत्री आणि रोजगार हमी योजनेचे मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचं ऑपरेशन झाले. मात्र, ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करत आपला संताप व्यक्त केला.

मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. पाहणी करत-करत भुमरे सरकारी दवाखान्याच्या दंत चिकित्सा विभागात पोहोचले. भुमरेंनी व्यवस्थेची विचारपूस केली. आणि त्यानंतर त्यांच्या दातांची तक्रार डॉक्टरांना सांगितली.

तपासणीनंतर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला.. मग भुमरेंनी आधी रुट कॅनल केलं आणि त्यानंतर शस्रक्रियेसाठी दवाखान्यात पोहोचले. खुद्द मंत्र्यांची शस्रक्रिया म्हटल्यावर सर्व डॉक्टर हजर राहिले. मात्र, ऐनवेळी लाईट गेली आणि सारा गोंधळ झाला.

पण, ऑपरेशन थिएटरमध्ये अनेक डॉक्टर उपस्थित असल्यामुळे सर्वांनी एकाचवेळी मोबाईल टॉर्च वापरुन ऑपरेशन पार पाडलं. ऑपरेशननंतर रुग्णालयात जनरेटर कसा नाही म्हणून भुमरेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं की जनरेटरची मागणी मागच्या पाच वर्षांपासून केली आहे. मात्र, त्यावर आजतागायत निर्णय झालेला नाही.

आता जनरेटर नसताना अचानक लाईट गेल्यावर काय होतं, याचा अनुभव खुद्द मंत्री संदीपान भुमरेंनाच आला होता. त्यामुळे भुमरेंनी रुग्णालयातूनच जनरेटरचा प्रस्ताव तातीडनं मंजुरीचे निर्देश दिले.

जोपर्यंत नवा जनरेटर पोहोचत नाही. तोपर्यंत कोविड सेंटरमधला जनरेटर सरकारी रुग्णालयात नेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. साध्या दाताच्या ऑपरेशनसाठी लाईट गेल्यावर काय होते याची प्रचिती मंत्री भुमरेंना आली.  मात्र, ज्या सरकारी रुग्णालयांची व्यवस्थाच अंधारात आहे., तिथं सामान्यांना काय-काय त्रास अनुभवावा लागत असेल.

तूर्तास किमान मंत्रीमहोदयाच्या ऑपरेशन निमित्तानं का असेना, औरंगाबादच्या रुग्णालयात जनरेटर येणार ही चांगली गोष्ट घडली. दुसरी गोष्ट म्हणजे संदीपान भुमरे स्वतः मंत्री असूनही त्यांनी सरकारी रुग्णालयात दाताचं ऑपरेशन केलं. याबद्दल त्यांचंही कौतुक करायला हवं.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.