वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे : उर्मिला मातोंडकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray birth anniversary) यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजीपार्कवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे : उर्मिला मातोंडकर
उर्मिला मातोंडकर
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 12:23 PM

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray birth anniversary) यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजीपार्कवर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी हजेरी लावली. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयावर भाष्य केलं. बाळासाहेबांमुळे बॉलिवूड सुरक्षित होतं, असं उर्मिला म्हणाल्या.

“आज मी शिवसेनेचा हिस्सा आहे. मात्र बाळासाहेबांबाबत नेहमीच आदर होता. बाळासाहेब ‘मातोश्री’त होते म्हणून चित्रपटसृष्टीत सुरक्षित होती. आमच्याकरिता बाळासाहेब आणि त्यांचे विचार अजूनही तसेच आहेत”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

उद्धव ठाकरे कृतीततून बोलतात

सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. बोले तैसा चालेल त्याची वंदावी पाऊले. लॉकडाऊनदरम्यान मंदिरे सुरु करण्यासंदर्भात मागणी होत होती. मात्र त्यावेळी धर्म म्हणजे केवळ मंदिर नाही, अशाप्रकारे परिस्थिती उद्धव ठाकरेंनी हाताळली, असं उर्मिलाने नमूद केलं.

VIDEO : बाळासाहेबांमुळे बॉलिवूड सुरक्षित : उर्मिला मातोंडकर

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “लोकांना संकटाच्यावेळी नेत्यांची आठवण येते. मात्र मला आनंदाच्या वेळी बाळासाहेबांची आठवण येते. कारण आमच्या जीवनात त्यांच्यामुळेच आनंदाचे दिवस आले आहेत. बाळासाहेबांचे विचार जिवंत राहतीलच. पुतळे-स्मारक हे फक्त निमित्त आहे. शिवसेना आणि शिवसैनिक हे बाळासाहेबांचे विचार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असं वक्तव्य केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळं वळण दिलं, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

(The man who speaks through action is Uddhav Thackeray said Urmila Matondkar on Balasaheb Thackeray birth anniversary )

संबंधित बातम्या 

‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं’, शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिवशी संजय राऊतांची भावना 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.