Governor : राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, ढोल वाजवून विचारणार जाब, या मंत्र्याच्या घरापासून होणार सुरुवात..

Governor : राज्यपालांप्रकरणी राज्य सरकारच्या बोटचेपे धोरणाविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. .

Governor : राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, ढोल वाजवून विचारणार जाब, या मंत्र्याच्या घरापासून होणार सुरुवात..
विचारणार जाबImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 9:12 PM

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे. ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवप्रेमी संघटनांनी राज्यपालांविरोधात संताप व्यक्त केला आहे. तरीही राज्य सरकारकडून याप्रकरणात बोटचेपे धोरण स्वीकारल्या जात असल्याने मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आक्रमक झाला आहे. सरकारमधील मंत्री आणि आमदारांना मराठा क्रांती मोर्चा आता थेट जाब विचारणार आहे. उद्यापासून मराठा क्रांती मोर्चा आंदोलन करणार आहे.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात वादग्रस्त विधान करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटले.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींकडे राज्यपालांची तक्रार केली. हे प्रकरण राष्ट्रपती भवनाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे वर्ग केले आहे. चौकशीनंतर राज्यपालांविरोधात कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.  लवकरच कारवाईची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांच्या वादग्रस्त विधाना विषयी राज्यातील जनतेची बाजू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला कळवल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितले. तरीही राज्यभर राज्यपाल हटविण्यासाठी जोरदार आंदोलन सुरु आहे.

पण राज्य सरकार याप्रकरणात बोटेचेपी भूमिका घेत असल्याने मराठा क्रांती मोर्चा उद्यापासून त्याचा निषेध करणार आहे. सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर ढोल वाजवून निषेध करण्यात येणार आहे. पुढील सात दिवस हे आंदोलन करण्यात येणार आहे.

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चा ढोल बजाव आंदोलन करणार आहे. पुढील सात दिवस विविध मंत्र्यांच्या, आमदारांच्या घरासमोर आंदोलन करुन त्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे शिवानंद भानुसे यांनी सांगितले.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...