Eknath Shinde : माझ्या घरावर दगड मारणारा अजून जन्माला यायचा आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

अनेक मंत्री याठिकाणी आहेत. हे सर्व मंत्रीपद डावावर लावून चालीस आमदार आणखी दहा आमदार पन्नास आमदार, एकीकडे बलाड्य असं सरकार, सरकारममध्ये बसलेली मोठी माणसं एकीकडे आणि दुसरं बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे.

Eknath Shinde : माझ्या घरावर दगड मारणारा अजून जन्माला यायचा आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले बंडाचे कारणImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 5:33 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात (House) आपलं मत व्यक्त केलं. यावेळी शिंदे म्हणाले, एकीकडे चर्चा करायचे दुसरीकडे काढून टाकायचे. माझ्या घरावर दगड मारायचे आदेश दिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारायची हिंमत कुणात नाही. जितेंद्र आव्हाडांना माहितीही माझ्या मागे किती लोक आहेत. मी आमदारांना सांगितलं होतं काळजी करू नका. मी तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि जगाचा निरोप घेईन. मी काय छोटीमोठी घटना नाही. एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकही जात नाही. हे का झालं याचा अभ्यास करायला हवा होता. मला अभिमान आहे आमच्या पन्नास लोकांचा, आम्ही मिशन सुरू केलं तेव्हा कुठे चाललोय. किती दिवस लागतील कुणी विचारलं नाही. मी मतदानादिवशी (Polling) डिस्टर्ब होतो. मतदानादिवशी मला नीट वागणूक मिळाली नाही. कशी वागणूक दिली ते यांनी पाहिलं आहे, याची आठवण त्यांनी विधानसभेत करून दिली.

33 देशांनी घेतली घटनेची नोंद

एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झालं आहे. गेले पंधरा-वीस दिवस, शिवसेनेचे चाळीस आमदार आणि अपक्ष दहा असे पन्नास आमदार माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत राहिले, त्यांना मी धन्यवाद देतो. मला विश्वास बसत नाही मी सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. आपण पाहिलं तर विरोधी पक्षातून सत्तेकडे जायची वाटचाल असते. मात्र आज आपण ऐतिहासिक घटना पाहतोय. मला देवेंद्र फडणवीस म्हणाले, फक्त देश नाही तर तेहत्तीस देशांनी या घटनेची नोंद घेतली आहे. सत्तेतून, मी नगरविकास मंत्री होतो. अनेक मंत्री याठिकाणी आहेत. हे सर्व मंत्रीपद डावावर लावून चालीस आमदार आणखी दहा आमदार पन्नास आमदार, एकीकडे बलाड्य असं सरकार, सरकारममध्ये बसलेली मोठी माणसं एकीकडे आणि दुसरं बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे.

अन्यायाविरुद्ध बंड केलं पाहिजे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी सांगितलं, अन्यायाविरुद्ध बंड असेल काही केलं पाहिजे. माझ्या मनात आलं आणि माझे फोन सुरु झाले. मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचे मला फोन होते. कुठे चाललात, म्हटलं मला माहिती नाही. एकाही आमदाराने म्हटलं नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून जाऊया. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही. यात सुनील प्रभुंना माहिती आहे. कसे माझे खच्चीकरण सुरू केलं होतं. मग मी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.