कोण आहे हा ‘सिंघम’ पोलीस ? ज्याने पाठवली थेट मुख्यमंत्री यांनाच नोटीस, म्हणाला.. यावंच लागेल नाही तर…
प्रचार दरम्यान केलेल्या एका गंभीर गुन्हा मुख्यमंत्री यांच्या हातून घडला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थेट मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे निवडणूक होऊन एक वर्ष झाल्यानंतर पोलिसांना या गुन्ह्याची आठवण झाली आहे.
गोवा : निवडणूक म्हटली की आरोप, प्रत्यारोप, प्रचार, प्रलोभन दाखवणे असे प्रकार घडतातच. प्रचारादरम्यान वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जातात. काही कधी हायटेक प्रचार केला जातो. याच प्रचार दरम्यान केलेल्या एका गंभीर गुन्हा मुख्यमंत्री यांच्या हातून घडला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थेट मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे निवडणूक होऊन एक वर्ष झाल्यानंतर पोलिसांना या गुन्ह्याची आठवण झाली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये गोवा विधानसभेसाठी निवडणूक झाली. या निवडणूक दरम्यान हा गुन्हा घडला आहे. त्यावेळी प्रचाराला ते मुख्यमंत्री आले होते.
पेरनेम पोलिसांनी ही नोटीस पाठविली दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पाठविली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष रिंगणात उतरला होता. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने गोव्यात ठिकठिकाणी पक्षाचे पोस्टर, बॅनर, भिंतीवर पोस्टर्स लावण्यात आले होते.
याच बॅनर, भिंतीवर पोस्टर्स लावण्यावरून गोवा पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. गोव्यातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि बेकायदेशीरपणे निवडणुकीचे पोस्टर लावल्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी 27 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासही पोलिसांनी सांगितले आहे.
पेरनेम पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप हलर्णकर यांनी ही नोटीस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवली आहे. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गोवा प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची चौकशी करण्यासाठी ही नोटीस पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ (ए) (गुन्हेगारी प्रक्रिया संहिता) अन्वये एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्याचा संशय असल्यास पोलीस त्याला नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावू शकतात असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या समन्सवर अरविंद केजरीवाल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.