Eknath Shinde : बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढला, 30 जूनपर्यंत शिंदे गट गुवाहाटीमध्येच राहणार

Eknath Shinde : बंडाशी भाजपाचा काही संबंध नाही, असंच राज्यातील नेते सांगत असले आहे. मात्र, तरीही सत्तेचं गणित जुळतंय का, तांत्रिक बाबी काय आहे, यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत देखील कळू शकलेलं नाही

Eknath Shinde : बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढला, 30 जूनपर्यंत शिंदे गट गुवाहाटीमध्येच राहणार
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 7:31 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम वाढल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्षाच्या बातम्या सुरु असतानाच ही बातमी आल्यानं आता पुढे नेमकं काय होतं. याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. गुजरातमध्ये शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात भेट झाल्याची माहिती आहे. या बैठकीला अमित शाह हे देखील उपस्थित होते, असं सांगण्यात येत असलं तरी त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. एकनाथ शिंदेंच्या बंडाशी भाजपाचा काही संबंध नाही, असंच राज्यातील नेते सांगत आहे. मात्र, तरीही सत्तेचं गणित जुळतंय का, तांत्रिक बाबी काय आहेत. यासंदर्भात एकनाथ शिंदे गटाकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, फडणवीस आणि शिंदे यांच्या भेटीत काय चर्चा झाली. याबाबत देखील कळू शकलेलं नाही. दरम्यान, शिंदे गटानं गुवाहाटीमधील मुक्काम 30 जूनपर्यंत वाढवल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

30 जूनपर्यंत मुक्काम का वाढला?

एकनाथ शिंदे गटानं शिवसेनेला भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा सल्ला दिलाय. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील सत्तेसाठी चाचपणी सुरू असल्याचं दिसतंय. पण, भाजप सावध पवित्रा घेऊन सत्तेची गणितं जुळवत असल्याचं बोललं जातंय. यामुळे शिंदे गटाला प्रत्येक निर्णय हा विचार करून घ्यावा लागत असल्याचं दिसतंय. कारण, शिवसेनेत परतीचे दोर आता पूर्णपणे कापले गेले आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या जहरी टिकेवरुन ते स्पष्ट देखील झालंय.

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं बंडखोर तापले

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानं एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार आणखीनच तापले असल्याचं दिसून आलं. यामुळे काहीही झालं तरी मुंबईत परतायचं नाही, असंच बंडखोरांना ठरवल्याचं दिसतंय. ‘बरं झाली घाण गेली, असे सांगत आता यापुढे सगळे चांगले घडणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केली याचे वाईट वाटते असे त्यांनी म्हटले आहे. या आमदारांत जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती, ठाण्यात राहता आले नसते का, असा प्रश्नही आदित्य यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडची दोन महत्त्वाची खआती नगरविकास आणि एमएसआरडीसी सारखी खआती एकनाथ शिंदेंना दिली, यापेक्षा त्यांना काय द्यायला हवं होतं, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना सत्तेचा मोह नव्हता. अनेक जण पुन्हा येईन म्हणत असताना, अनेक मंत्री बंगले सोडत नसताना, आम्ही तातडीने वर्षा निवासस्थान सोडले, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.