IPL Final च्या दिवशीच ठरणार बिहारचा बाहुबली कोण?

बिहारमध्ये एकूण 3 टप्प्यांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. | ( 10 November Bihar Election And IPL 2020 Result )

IPL Final च्या दिवशीच ठरणार बिहारचा बाहुबली कोण?
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 4:38 PM

बिहार : बिहार विधानसभा निवडणुकांचे ( Bihar Election 2020 ) बिगुल वाजले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमध्ये एकूण 3 टप्प्यांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तर 10 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. विशेष म्हणजे 10 नोव्हेंबरलाच आयपीएलच्या 13 व्या मोसमातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी बिहारची सत्ता कोण काबीज करणार आणि आयपीएलच्या 13 व्या मोसमाची ट्रॉफी कोण उंचावणार हे समजणार आहे. ( 10 November Bihar Election And IPL 2020 Result )

बिहारमधील एकूण 243 जागांसाठी 3 टप्प्यात मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. पहिला टप्प्यातील मतदानप्रक्रिया 28 ऑक्टोबरला पार पडेल. यात एकूण 71 जागांसाठी मतदान केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबरला होणार आहे. हे मतदान एकूण 94 जागांसाठी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान एकूण 78 जागांसाठी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तर या तीनही टप्प्यातील मतदानाचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे.

आयपीएल 2020 चा अंतिम सामना

आयपीएलच्या 13 व्या मोसमाची सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनापरिस्थिीमुळे यंदाच्या आयपीएलच्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. आयपीएलच्या या मोसमाचं वेळापत्रक 6 सप्टेंबरला जाहीर करण्यात आलं होतं. आयपीएलच्या साखळी फेरीत एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत. यूएईतील दुबई, अबुधाबी आणि शारजा या मैदानांवर आयपीएलचे हे सामने खेळले जाणार आहेत. बीसीसीआयनुसार आयपीएलच्या या मोसमातील अंतिम सामना हा 10 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आयपीएलची फायनल मॅच रविवारी खेळवण्यात येत होती. मात्र यंदा मंगळवारी खेळण्यात येणार आहे.

कोरोनामुळे बिहार निवडणुकीवर काही प्रमाणात बंधंन आली आहेत. तसेच नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

कोरोना परिस्थितीत बिहारमध्ये मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या दरम्यान मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कोरोनाग्रस्तांनाही आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. शेवटच्या एक तासात म्हणजेच 5-6 या दरम्यान कोरोनाग्रस्तांना मतदान करता येणार आहे. उमेदवारांना प्रचारसभेत सामाजिक अंतराचं भान राखावं लागणार आहे.

मोठ्या धुमधडाक्यात उमेदवारी अर्ज दाखल केला जातो. आता मात्र त्या संबंधित उमेदावारासोबत फक्त 2 जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. उमेदवारासह एकूण 5 जणांनाच दारोदार प्रचार करता येणार आहे. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगानेही खबरदारी घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाला एकूण 6 लाख पीपीई कीट पुरवण्यात येणार आहे. तसेच यासोबत 46 लाख मास्क आणि 7 लाख सॅनिटायजर देण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

Bihar Elections | चिराग पासवान मुख्यमंत्रिपदाचे दावेदार, लोजप आग्रही; एनडीएशी वाटाघाटी

Bihar Election | बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?

( 10 November Bihar Election And IPL 2020 Result )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.