Raj Thackeray : महाराष्ट्रात ‘योगी’ कुणी नाही, फक्त सत्तेचे ‘भोगी’!, राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक, महाराष्ट्र सरकारवर टीका
महाराष्ट्रात 'योगी' कुणी नाही, फक्त सत्तेचे 'भोगी'!, राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक
मुंबई : ‘उत्तर प्रदेशातील (UP) धार्मिक स्थळांवरील, विशेषत:मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!,’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचं कौतुक केलंय तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारवर (Raj Thackeray) टीका केली आहे. एकीकडे राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष केलंय तर दुसरीकडे त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय. यामुळे भोंग्यांवरुन सुरु झालेल्या वाद आता वाढतच चालल्याचं दिसतंय. दरम्यान, दुसरीकडे औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पोलीस राज ठाकरे यांना नोटीस बजावणार आहेत. शिवाय त्यांच्यासमोर काही अटी आणि शर्थीही ठेवल्या जाणार आहेत. त्यानुसार सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. यावरुन आता भोंग्यांचा मुद्दा अधिक पेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
राज ठाकरे यांचे ट्विट
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
ट्वीट टाकताना #Azaan आणि #Loudspeakers हे दोन हॅशटॅग देण्यात आलंय. तर अभिनंदनाचं पत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ट्वीट केलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला तीन मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर राज्यासह देशभरात वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता तीन मे रोजी काय होणार याकडे लक्ष लागून आहे.
सभेला परवानगी मिळणार?
औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पोलीस राज ठाकरे यांना नोटीस बजावणार आहेत. शिवाय त्यांच्यासमोर काही अटी आणि शर्थीही ठेवल्या जाणार आहेत. त्यानुसार सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी लागेल. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये, असे आवाहन करण्यात येणार आहे. व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये. वाहन पार्किंगचे नियम पाळावेत. सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही. सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत. सामाजिक वातावरण, सलोखा बिघडेल असे कुठलेही वर्तन तयार करण्यात येऊ नये, यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.