Karnataka Election result 2023 : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण?, या दोन नेत्यांना दिल्लीतून बोलावणं, उद्या होणार फैसला
Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेस १३१ जागांवर आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकाची मत ही भाजपला मिळाली आहेत. भाजपचे ६६ उमेदवार हे आघाडीवर आहेत.
बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहेत. कर्नाटकात २२४ जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली. विद्यमान परिस्थितीत काँग्रेसला बहुमत मिळेल, असे दिसते. काँग्रेस १३१ जागांवर आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकाची मत ही भाजपला मिळाली आहेत. भाजपचे ६६ उमेदवार हे आघाडीवर आहेत. जेडीएसने २१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर सहा जागांवर पुढे आहेत. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसची सरकार बसेल. असे जवळपास निश्चित झाले आहे.
दोन पर्यवेक्षक नेमण्यात आले
दिल्लीमध्ये सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना बोलावण्यात येणार आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण, याचा दिल्लीत उद्या फैसला होणार आहे. मुख्यमंत्री पदासाठी दोघेही उत्सुक आहेत. काँग्रेसचे दोन पर्यवेक्षक यासाठी नेमण्यात आलेत. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक आहेत.
डी. के. शिवकुमार एक लाख मतांनी विजयी
दोघेही सात-सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर सोपावण्यात आली होती. डी. के. शिवकुमार हे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पद मिळावं, अशी त्यांची अपेक्षा आहे.
कर्नाटकात काँग्रेसची मुसंडी
काँग्रेस बहुमतात असल्याने ते सत्ता स्थापनेचा दावा करणार. यापूर्वी काँग्रेसला यापूर्वी कर्नाटकात येवढी आघाडी मिळाली नव्हती. २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसला १२१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसने कर्नाटकात मुसंडी मारली.
कुमारस्वामी यांच्या मुलाचा पराभव
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आतापर्यंतच्या सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या मुलाचा पराभव झाला आहे. रामता यांचा पराभव झालाय. कुमारस्वामी यांचा थोडक्यात विजय झाला आहे. जेडीएसलाही मोठा फटका बसला. २१ जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं.
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला पराभव
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बसवराज बोम्मई यांनी पराभव स्वीकारला आहे. आम्ही आमच्या लक्ष्यापर्यंत पोहचू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी दिली आहे. सर्व निकाल आल्यानंतर विस्तृत विश्लेषण करू, असे ते म्हणाले.