AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee : सत्ता मिळवली पण महाराष्ट्राचे मन जिंकलेले नाही, भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वास

मला विश्वास आहे की हे सरकार अधिक काळ सत्तेत राहणार नाही. हे अनैतिक तसेच लोकशाही मधून तयार झालेले सरकार नाही. सध्या त्यांनी सरकार जिंकले आहे. पण त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले नाही असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.

Mamata Banerjee : सत्ता मिळवली पण महाराष्ट्राचे मन जिंकलेले नाही, भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वास
भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वासImage Credit source: twitter
| Updated on: Jul 05, 2022 | 8:35 AM
Share

मुंबई – मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवरती देशातील सगळ्या राजकीय नेत्यांचं लक्ष होतं. महाराष्ट्रातलं बंड गुजरातमध्ये गेलं त्यानंतर ती जागा असुरक्षित असल्याचं लक्षात आल्यानंतर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटी गाठली. हे संपुर्ण राजकारण अवघ्या देशाने पाहिलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी बंडखोर आमदारांना पैश्याशिवाय आणखी काय देण्यात आलं असा गौप्यस्फोट ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सरकार बेकायदा आहे. त्यांच्या सरकारने सत्ता मिळवली असली तरी महाराष्ट्राचे मन आणि ह्दय त्यांना जिंकता आलेले नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. सत्तेचा दुरूपयोग करून त्यावर बुलडोझर फिरवला जात आहे. मात्र पुढच्या निवडणुकीत जनताच भाजपसाठी बुलडोझर बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपसाठी जनता बुलडोझर बनेल ममता बॅनर्जींना विश्वास

मला विश्वास आहे की हे सरकार अधिक काळ सत्तेत राहणार नाही. हे अनैतिक तसेच लोकशाही मधून तयार झालेले सरकार नाही. सध्या त्यांनी सरकार जिंकले आहे. पण त्यांनी महाराष्ट्राचे मन जिंकले नाही असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. तुम्ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीवरती बुलडोज चालवू शकता. पण या देशातील जनता लोकशाही मार्गाने तुमच्यासाठी बुलडोझर बनेल. तसेच ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना “आसाममध्ये भाजपकडून पैसे आणि इतर गोष्टींचा पुरवठा केला असा आरोप केला.

भाजप आणि केंद्र सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केली

घराणेशाहीच्या राजकारणाच्या भाजपच्या वारंवार वापरल्या जाणार्‍या टीकेला देखील त्यांनी जोरदार उत्तर दिले. भाजप आणि केंद्र सरकारवरती त्यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर अनेकांचं लक्ष महाराष्ट्रातल्या राजकारणाकडं लागलं होतं. तब्बल दहा सुरू असलेल्या या राजकीय नाट्यात महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालं आणि नवं सरकार आलं.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.