Rajya Sabha Election Results 2022 : त्यांनी पेरलं ते उगवलं, श्रीकांत भारतीय यांचा महाविकास आघाडीला टोला, ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केल्याचा आरोप
राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडीने आतापर्यंत केलेल्या कामाचा परिणाम असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. याचं कारण महाविकास आघाडीनं आतापर्यंत जे पेरलं ते उगवलं, अशी टीकाही श्रीकांत भारतीय यांनी केली.
अमरावती : भाजपचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार श्रीकांत भारतीय (Shrikant Bharatiya) यांनी अमरावतीमध्ये आई वडिलांचे आशीर्वाद घेतले. कुटुंबाला भेटण्यासाठी व आई वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रीकांत भारतीय अमरावतीमधील त्यांच्या घरी आले होते. अमरावती (Amravati) महानगरपालिका निवडणुकीत ताकदीने भाजपचा प्रचार करणार आहेत. कालची लढाई ही विश्वासघात विरुद्ध विश्वास होती. अडीच वर्षांपूर्वी विश्वासघाताने हे सरकार आलं. या सरकारचा पिंडचं विश्वासघाताचा आहे. त्यांनी पेरलं ती उगवलं, असं ते म्हणाले. शरद पवार यांनी जनतेचा विश्वासघात केला. उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचा (BJP) पार्टीचा विश्वासघात केला, असा घणाघात श्रीकांत भारतीय यांनी अमरावतीत केला.
श्रीकांत भारतीय यांची टीका
अमरावती महानगर पालिका निवडणुकीत श्रीकांत भारतीय हे भाजपचा प्रचार करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यात महाविकास आघाडीने आतापर्यंत केलेल्या कामाचा परिणाम असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. याचं कारण महाविकास आघाडीनं आतापर्यंत जे पेरलं ते उगवलं, अशी टीकाही श्रीकांत भारतीय यांनी केली.
कोण आहेत श्रीकांत भारतीय
श्रीकांत भारतीय हे संघटन मंत्री म्हणून कार्यरत आहेत. देवेंद्र फडणवीस असताना श्रीकांत भारतीय यांनी ओएसडी म्हणून काम केलंय. भाजप आणि संघ परिवाराशी त्यांचे चांगले संबंध आहेत. संघटनमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी थेट आमदारकीची संधी चालून आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते भाजपचे पडद्यामागील रणनितीकार आता विधान परिषदेतील उमेदवार झालेत. पश्चिम विदर्भातील भाजप पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.
श्रीकांत भारतीय यांचे योगदान काय
1985 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. विदर्भाचे प्रदेश संघटनमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. 1994 पासून ते पूर्णवेळ भाजपचे कार्यकर्ते आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते वॉर रूपचे प्रमुख होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना ग्रामीण भागात मजबूत करण्याची व्यूवनीती त्यांनी आखली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत.