AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC election 2022 : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नवं ट्विस्ट येणार? ठाण्यात वॉर्ड क्रमांक 27 ची स्थिती काय?

एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांना मिळणारा ठाण्यातून पाठिंबाही वाढला आहे. अर्थातच सुरुवातीपासून ठाण्यावरती एकनाथ शिंदे यांचा मोठा होल्ड आहे. मात्र तेच आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

TMC election 2022 : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नवं ट्विस्ट येणार? ठाण्यात वॉर्ड क्रमांक 27 ची स्थिती काय?
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नवं ट्विस्ट येणार? ठाण्यात वॉर्ड क्रमांक 27 ची स्थिती काय?Image Credit source: tv9
| Updated on: Aug 07, 2022 | 3:47 PM
Share

ठाणे : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांनी (Maharashtra Municipal Corporation Election 2022) धुरळा उडून दिला आहे. काही शहरी महानगरपालिका पाहिल्यास, मुंबई जवळच्या म्हणजेच मुंबई आणि उपनगर क्षेत्रातल्या महानगरपालिकांवरती नजर टाकल्यास या महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीपासूनच शिवसेनेचा दबदूबा असल्याचे दिसून येत होते. मात्र एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडामुळे यावेळची महानगरपालिका निवडणूक शिवसेनेसाठी सोपी नसणार आहे. त्यातच आता ठाणे महानगरपालिकेबद्दल (TMC election 2022) बोलायचं झाल्यास ठाणे महानगरपालिका एक हाती एकनाथ शिंदे यांची होईल असंच काही सचित्र सध्या निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांना मिळणारा ठाण्यातून पाठिंबाही वाढला आहे. अर्थातच सुरुवातीपासून ठाण्यावरती एकनाथ शिंदे यांचा मोठा होल्ड आहे. मात्र तेच आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्ड रचना आणि आरक्षणंही बदलली

आदित्य ठाकरे ठाण्यात पुन्हा जम बसवण्यासाठी जोर लावत असले तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे. त्यातच वॉर्डची आरक्षणे आणि रचना बदलल्यामुळे हेही एक वेगळाच गणित ठरणार आहे. तसेच ठाण्यात राष्ट्रवादीची ताकद ही मोठी आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

वॉर्डची आकडेवारी काय सांगते?

आता ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 27 च्या आकडेवारी एक नजर टाकूया या वार्डमध्ये आनंद नगर, कशिश पार्क, रहेजा गार्डन, रघुनाथ नगर, असा मोठा भाग येतो. एकूण लोकसंख्या ही 34 हजार 645 आहे तर अनुसूचित जातीचे या ठिकाणी 3528 मतदार आहेत तसेच 414 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत. त्यामुळे हे जातीय समीकरण ही प्रत्येक राजकीय पक्षाला लक्षात ठेवावं लागणार आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

ठाण्यात यंदा वेगळं चित्र दिसण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा ठाण्यातला अनेक भाग पिंजून काढला. तसेच ठाण्यातले माजी महापौर नरेश मस्के यांनीही एकनाथ शिंदे यांना उघड पाठिंबा दिला. तसेच अनेक नगरसेवकांनी ही लगेच शिंदे गटाची वाट धरली होती. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक आणखी सोपी झाले आहे. त्यातच स्वतः भाजपही या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाने ही निवडणूक एकत्र लढल्या लढवल्यास ही निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज राजकीय पंडित वर्तवत आहेत, आता ती वेळ जवळ आली आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.