‘त्यांची आमच्यासोबत बसण्याची औकात नाही’, आपसात भिडाभीड, INDIA आघाडी तुटणार का ?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात सर्वच राजकीय पक्ष आपपाली मोर्चेबांधणी करत आहेत. भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यापासून रोखणं हेच विरोधी पक्षांच प्रमुख लक्ष्य आहे. विरोधी INDIA आघाडीच्या नावाखाली एकत्र आलेत. यात काँग्रेस मुख्य पक्ष आहे. पण आता इंडिया आघाडीतच एक वाक्यता नसल्याच दिसून येतय.

'त्यांची आमच्यासोबत बसण्याची औकात नाही', आपसात भिडाभीड, INDIA आघाडी तुटणार का ?
india alliance
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 10:50 AM

नवी दिल्ली : पुढच्यावर्षी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाची Hattrick करण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आला आहे. काँग्रेस मोठा पक्ष आहे. विरोधकांनी आपल्या आघाडीला INDIA नाव दिलय. सर्व विरोधक भाजपाला हरवण्याची प्लानिंग करत आहेत. पण त्याचवेळी विरोधी पक्षांमध्ये आपसातही जमत नाहीय. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि डाव्या पक्षामध्ये परस्पर विरोधाचे सूर तीव्र होऊ लागले आहेत. सीपीआय (एम) वर टीएमसी नेते कुणाल घोष यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. बंगालमध्ये ‘लेफ्ट’ नाहीय. लेफ्ट पार्टीच्या लोकांची TMC सोबत बसण्याची औकात नाहीय, असं ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयासंबंधी कृणाल घोष म्हणाले की, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितलय की, इंडिया आघाडी देशामध्ये लढेल आणि टीएमसी बंगालमध्ये भाजपाविरोधी अभियानाच नेतृत्व करेल. आम्ही 2021 मध्ये भाजपाला हरवलं. सीपीआय (एम) आणि काँग्रेसला शुन्य जागा मिळाल्या. त्यांनी भाजपाच्या फायद्यासाठी मतविभाजन केलं. जागा वाटपासंबंधी ममता बॅनर्जी अंतिम निर्णय घेतील. इथे कुठला लेफ्ट पक्ष नाहीय” “लेफ्टच्या लोकांची टीएमसीसोबत बसण्याची औकात नाहीय” असं कृणाल घोष एएनआयशी बोलताना म्हणाले.

इंडिया आघाडीतच एक वाक्यता नाही

शुक्रवारी दिल्लीत जेडीयूची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची सर्वसम्मतीने जनता दल यूनायटेडच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजीव रंजन (ललन) सिंह यांच्या राजीनाम्यानंतर सीएम नितीश कुमार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. जेडीयूचे काही सदस्य कॉन्स्टिट्यूशन क्लब बाहेर घोषणाबाजी करत होते, ‘देशाचा पंतप्रधान नितीश कुमार यांच्यासारखा असावा’ नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीच नेतृत्व कराव अशी जेडीयू नेत्यांची इच्छा आहे. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी सार्वजनिक ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संभाव्य पीएम उमेदवार म्हणून घोषित केलय. त्यामुळे इंडिया आघाडीतच एक वाक्यता नसल्याच दिसतय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.