Mahua moitra | महिला नेत्या महुआ मोइत्रावर एक्स बॉयफ्रेंडचा गंभीर आरोप, CBI पर्यंत पोहोचल प्रकरण
Mahua moitra | महिला नेत्या महुआ मोइत्रा पुन्हा एकदा वादात अडकल्या आहेत. प्रकरण सीबीआयपर्यंत गेलय. वकील जय अनंत देहाद्राई यांनी तपास यंत्रणेला पत्र लिहून महुआवर आरोप केलाय. महुला मोइत्राचा असा इतिहास असल्याच त्याने म्हटलय.
नवी दिल्ली : तृणमुल काँग्रेसच्या महिला नेत्या महुआ मोइत्रा मागच्या काही काळापासून राजकीय अडचणींचा सामना करत आहेत. त्या आता एका नव्या वादात सापडल्या आहेत. महुआ मोइत्रा आणि वकिल अनंत देहाद्राई यांच्यातील भांडण मागच्या काही महिन्यांपासून मीडियामध्ये गाजत आहे. आता अनंत देहाद्राई यांनी महुआ मोइत्रा यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. एडवोकेट जय अनंत देहाद्राई यांनी सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चिठ्ठी लिहीली आहे. या चिठ्ठीमधून त्यांनी तृणमुल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्यावर आरोप केला आहे. महुआ मोइत्रा यांनी पूर्व प्रियकरावर पाळत ठेवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने हेरगिरी केली, असा आरोप अनंत देहाद्राई यांनी केलाय. पाठिमागून माहिती मिळवणं. कॉल रिकॉर्ड विवरण प्राप्त करण्यासाठी पोलिसांचा वापर करण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे असा आरोप अनंत देहाद्राई यांनी पत्रातून केला आहे.
महुआने आपल्या ओळखीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असा आरोप आहे. निवासस्थानाबाहेर वाहनांवर नजर ठेवली जात असल्याचा तक्रारदाराच्या मनात संशय होता. महुआ मोइत्रा यांनी खासदार म्हणून आपल्या अधिकारांचा वापर धमकावण तसच ठिकाणांबद्दल माहिती मिळवण्यासाठी केला. पश्चिम बंगालचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून फोन टॅपिंग पर्यंतचा संशय अनंत देहाद्राई यांनी व्यक्त केलाय.
पूर्व प्रियकराच ट्रॅकिंग
पश्चिम बंगाल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत असलेली ओळख आणि संबंधांचा दुरुपयोग करुन खासगी व्यक्तींचे कॉल डिटेल रिकॉर्ड (सीडीआर) मिळवण्याचा मोइत्रा यांचा इतिहासच आहे असा आरोप पत्रातून करण्यात आलाय. महुआ मोइत्राने अनेकदा तोंडी तसच लिखितमध्ये मला सांगितलं होतं की, ती तिच्या पूर्व प्रियकराला ट्रॅक करत आहे, असं तक्रारदाराने पत्रात लिहिलय. बंगालच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने महुआकडे फोनची पूर्ण सीडीआर हिस्ट्री होती, याच मला आश्चर्य वाटलं असं तक्रारदाराने म्हटलय.