विधीरत्न राम कदम यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही – अनिल परब

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

विधीरत्न राम कदम यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही - अनिल परब
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 4:36 PM

मुंबई :विधीरत्न राम कदम यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही (Anil Parab Slams Kangana Ranaut). कंगना रनौतने केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली आणि कदमांनी राज्य सरकारने सुरक्षा का दिली नाही असं ट्वीट केल”, असं म्हणत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदार राम कदम यांना खोचक टोला लगावला आहे (Anil Parab Slams Kangana Ranaut).

अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्यावरुन शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. एकीकडे भाजपचे काही नेचे कंगनाचं समर्थन करत आहेत, तर शिवसेनेचे नेते कंगनावर सडेतोड टीका करत आहेत.

परिवहनमंत्री अनिल परब काय म्हणाले?

“सुशांत सिंह प्रकरणातील काही सिक्रेट्स आहेत आणि मला केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी, तर मी ती सर्व सिक्रेट्स केंद्र सरकारकडे देईन, असं ट्वीट अभिनेत्री कंगना रनौतने केलं. त्यावर थोर विधीरत्न राम कदम यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही, त्यांनी दुसरं ट्वीट केलं, की एवढे तास झाले अजून महाराष्ट्र सरकारने सुरक्षा का दिली नाही. केंद्र शासनाकडे मागितलेली सुरक्षा यावर राज्य शासनाचं उत्तर, यावरुन राम कदमांचा अभ्यास कळून येतो”, असा खोचक टोला अनिल परब यांनी राम कदमांना लगावला.

“आज सीबीआयच्या हातात तपास जाऊन 15 दिवस झाले आहेत. या 15 दिवसांत कंगना रनौतने कुठल्याही प्रकारचं अधिकृत सुरक्षा सीबीआयकडे मागितली नाही किंवा त्यांच्याकडे असलेले माहिती सीबीआयला दिलेली नाही. केवळ वातावरण खराब करण्याच्या अनुषंगाने ट्वीट करत राहायचं”, असं म्हणत अनिल परबांनी कंगनाला सुनावलं.

संजय राऊतांनी दिलेलं उत्तर अगदी बरोबर – अनिल परब

“ज्यावेळी कंगनाने असं म्हटलं की, मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही, त्यावर संजय राऊतांनी जे उत्तर दिलं ते अगदी बरोबर आहे. ज्या मातीने ज्या महाराष्ट्राने तुम्हाला मोठं केलं. त्या महाराष्ट्राचं गुणगाण गाणारे कलावंत देखील या महाराष्ट्रात आहेत. जितेंद्र, अमिताभ, राजेश खन्ना अशा सर्व कलाकारांनी महाराष्ट्राच्या मातीबाबत नेहमी गौरवोद्गार काढले आहेत”, असंही ते म्हणाले.

“आजकाल काही कलावंत खायचं मुंबईचं, मुंबईत भरमसाठ पैसे कमायचे आणि मुंबईला बदनाम करायचं अशा प्रकारचं वातावरण तयार करत आहेत. काही अभिनेते मुंबईतच मोठे होतात आणि मुंबईवरच टीका करतात.”

“POK मध्ये कंगना कधी गेल्या? यांचा POk शी काय संबंध? POK मध्ये यांना काय अनुभव आले, ज्याची तुलना त्यांनी मुंबईशी केली, मुंबईच्या सरकारवर, पोलिसांवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला मुंबईत राहाण्याचं कारण नाही, ज्या सरकारवर तुमचा विश्वास आहे त्या राज्यात तुम्ही राहावं, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली”, असं म्हणत अनिल परब यांनी संजय राऊतांच्या भूमिकेचं समर्थन केलं.

मुंबईचं बॉलिवूड इतर कुठे हलवण्याचा कट तर शिजत नाही ना? – अनिल परब

“वारंवार मुंबई पोलिसांची, सरकारची, महाराष्ट्राची बदनामी करुन जो महाराष्ट्र आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, लॉकडाऊनच्या काळात 16 हजार कोटीचे करार राज्याने केले. म्हणजे लोक महाराष्ट्रात येऊ इच्छितात, आपले उद्योग आणू इच्छितात, त्या लोकांना महाराष्ट्र किती खराब आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार करुन त्यांना मुंबईत यायला परावृत्त करायचं प्रयत्न केला जात आहे” (Anil Parab Slams Kangana Ranaut)

“कारण, मुंबईतील फायनान्शिअल सेंटर गुजरातमध्ये गेलं. बरीचशी कार्यालयं गुजरातमध्ये हलवली, अशा प्रकारचं वातावरण करुन मुंबईचं बॉलिवूड इतर कुठे हलवण्याचा कट तर शिजत नाही ना? मुंबईत स्थिरस्थावर झालेल्या परप्रांतीयांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न तर नाही ना?, अशा प्रकारने एक-एक इंडस्ट्री मुंबईतून काढण्याचं कुठलं कारस्थान तर चालू नाही ना, असा प्रश्न आता समोर उभा राहिला आहे”

कंगनाने तिच्याकडे असलेले पुरावे सीबीआयला द्यावे – अनिल परब

“माझं कंगना रनौतला आवाहन आहे की त्यांच्याकडे सुशांत सिंह प्रकरणाबाबत जे काही पुरावे आहेत, ते त्यांनी सीबीआयकडे द्यावेत आणि जे काही ड्रग्ज माफियांमुळे सुशांतचा मृत्यू झाल्याचं त्यांना वाटत असेल, तर त्यांनी ते मुळापासून संपण्याचं काम करायला हवं”, असं आवाहन अनिल परब यांनी

“आम्ही कधीच परप्रातीयांना सांगितलं नाही की मुंबईच्या बाहेर जा. आम्ही मुंबईत सर्वांना सामावून घेतो, वातावरण खराब करु नका, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करु नका. माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की अशाप्रकारे जर कोणी वातावरण खराब करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे”, असंही अनिल परब म्हणाले.

“केवळ चित्रपटात झाशीची राणीची भूमिका केली म्हणून कुणी झाशीची राणी होत नाही”, अशी टीका अनिल परब यांनी केली.

Anil Parab Slams Kangana Ranaut

संबंधित बातम्या :

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा, कंगनाचा एल्गार, थोबाड फोडणार, शिवसेनेचा पलटवार

आम्ही धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, राऊतांचा रनौतवर हल्ला

फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.