Nagpur : अनिल देशमुखांच्या बंगल्यावर झाड कोसळलं, बंगल्याचा काही भाग डॅमेज; विदर्भात वादळी पावसाची हजेरी
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्य़ासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यानुसार अनेक जिल्ह्यांना अलर्ट राहण्याचा संदेश देखील देण्यात आला आहे. काल नागपूरात दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने केव्हाही पाऊस पडेल अशी स्थिती होती.
नागपूर – राज्याचे माजी मंत्री रणजित देशमुख (Ranjeet Deshmukh) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या बंगल्यावरती अचानक झाड कोसळलं. दोन मंत्र्यांच्या बंगल्यावरती झाडं कोसळलं त्यावेळी तिथं कोणीही नसल्याने कसल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही. बंगल्यावरती कोसळलेलं झा़ड अतिशय मोठ असून त्यामुळे मोठं नुकसान झालं असतं. परंतु एका बाजूला झाड कोसळल्यानं घराचं कमी प्रमाणात नुकसान झालं आहे. झाड कोसळल्याची माहिती अग्निशमक दलाला दिल्यानंतर काहीवेळात घराच्या बाजूला पडलेला झाडाचा भाग हटवण्यात आला आहे. काल नागपूरात (Nagpur) वादळी पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. नागपूरसह राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. राज्यात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पुर्व मोसमी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढचे आठदिवस पुर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
वादळी पावसामुळे पडलं झाड
राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्य़ासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यानुसार अनेक जिल्ह्यांना अलर्ट राहण्याचा संदेश देखील देण्यात आला आहे. काल नागपूरात दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने केव्हाही पाऊस पडेल अशी स्थिती होती. अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. राज्याचे माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या घराशेजारी असलेलं भलं मोठं त्यांच्या बंगल्याच्या एका कोपऱ्यावरती कोसळलं. त्यावेळी तिथं कोणी नसल्याने जीवीत हानी ठळली. रणजित देशमुख यांच्या शेजारी असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरती त्या झाडाचा काहीभाग कोसळला आहे.
वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला
काल नागपूरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नागपुरात वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळी पावसाचा शेतीवर परिणाम होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. भर दुपारी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. यंदाच्यावर्षी लवकर पाऊस सुरू होणार आहे.