AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, तृप्ती देसाई आक्रमक

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, तृप्ती देसाई आक्रमक
धनंजय मुंडेंचा सत्कार करणाऱ्यांनी आपली मानसिकता तपासायला हवी; तृप्ती देसाईंचा हल्लाबोल
| Updated on: Jan 14, 2021 | 10:09 PM
Share

पुणे :  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन आता राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे.  त्यानंतर विविध राजकीय घडामोडींनी गेले दोन ते तीन दिवस गाजले. विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आता सामाजिक क्षेत्रातूनही मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. (Trupli Desai Comment on Dhananjay Munde Rape Case)

धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती देवून सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याचे कबुली दिल्यामुळे “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” असा संदेश जनतेमध्ये जात आहे जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

फडणवीसांची मवाळ तर चंद्रकांतदादांची जहाल भूमिका

धनंजय मुंडे यांच्यावरती बोलताना भाजपच्या नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. तर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु”, असं म्हणत फडणवीसांनी आश्चर्यकारक भूमिका घेतली.

प्यार किया तो डरना क्या?, शिवसेना नेते राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुंडेंच्या पाठीशी

‘प्यार किया तो डरना क्या’, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. “धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.

(Trupli Desai Comment on Dhananjay Munde Rape Case)

संबंधित बातम्या 

…तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप

मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली

संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नसतो, मनसेच्या रुपाली पाटील यांचं रोखठोक वक्तव्य

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.