tv9 Explainer: नवाब मलिकांचं ‘D’ कनेक्शन? दाऊदची बहिण ते नवाब मलिकांच्या दोन मुली, ईडीचं जाळं समजून घ्या !
ईडीने मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर मलिक यांच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत मलिक हेच पीडित असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हे प्रकरण अधिक खोलवर जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे प्रकरण माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी ईडीने मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर मलिक यांच्या वकिलांनी हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत मलिक हेच पीडित असल्याचं म्हटलंय. त्यामुळे हे प्रकरण अधिक खोलवर जाऊन समजून घेणं गरजेचं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे प्रकरण माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता.
नवाब मलिकांना अटक का?
3 फेब्रुवारीला एनआयएने दाऊत विरोधात गुन्हा दाखल केलाय. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसंच अन्य गुन्ह्यात दाऊदचा सहभाग आहे, असं ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात याची माहिती दिली आहे. इतकंच नाही तर मलिक आणि दाऊद यांच्यात कसे संबंध आहेत, हे देखील त्यांनी न्यायालयात सांगितलं. त्यानुसार दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर दाऊदचा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदची बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.
दाऊदची 200 कोटी रुपयांची संपत्ती कमी किंमतीत विकत घेतली. हा व्यवहार रोखीने झाला. त्यात 55 लाखाचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे या संपत्तीची मालकी आहे. या कंपनीवर मलिक यांचा मुलगा संचालक आहे. काही काळ ही कंपनी मलिक यांच्या नियंत्रणाखाली होती, असा आरोप सिंग यांनी कोर्टात केलाय. इतकंच नाही तर कुर्ल्यातील मालमत्ता मरियम आणि मुनिरा या दोघींच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन मुळात दाऊद गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. ही जमीन सलीम पटेलची होती आणि तो अंडरवर्ल्डशी संबंधित होता. ती संपत्ती आता मलिक यांच्या कंपनीकडे आहे, असंही सिंग यांनी म्हटलंय.
नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद काय?
दरम्यान, आज कोर्टात युक्तीवाद करताना मलिक यांचे वकील अमित देसाई म्हणाले की, हसीना पारकरकडून जमीन विकत घेतल्याचा दावा ईडी करत आहे, ती जागा सलीम पटेल नावाच्या व्यक्तीची होती. मात्र, तो सलीम पटेल दुसरा आहे. हसीना पारकरचा लाक हा सलीम पटेल उर्फ सलीम फ्रूट होता. मात्र, या नावाचे दोन व्यक्ती होते. सलीम फ्रूट हा मेला आहे. तर दुसरा सलीम जिवंत आहे. पहिल्याचा डी गँगशी संबंध होता, तर दुसऱ्याचा मात्र संबंध नव्हता, असा दावा देसाई यांनी केलाय.
Breaking – Maharashtra Cabinet Minister and NCP leader #NawabMalik arrested by Enforcement Directorate.@nawabmalikncp pic.twitter.com/tLJ4rf4uyL
— Live Law (@LiveLawIndia) February 23, 2022
नेमकं प्रकरण काय?
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर रोजी एक पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड कनेक्शनचा आरोप केला होता. मलिक यांचा सहभाग असलेल्या किमान 5 व्यवहारांमध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं फडणवीस म्हणाले होते. 2005 पासून दोन वर्षापूर्वीपर्यंत म्हणजेच अल्पसंख्याक मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळण्यापर्यंत झालेल्या व्यवहारात समावेश असल्याचं फडणवीस म्हणाले होते.
मुंबईच्या एलबीएस रोडवरील 2.8 एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही 3.5 कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली. सलीम पटेल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर, फ्रंट मॅन आहे, तो देखील या जमिनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर असल्याचं फडणवीस म्हणाले होते.
#WATCH | Mumbai: NCP leader and Maharashtra Minister Nawab Malik being brought out of Enforcement Directorate office, to be taken for medical examination.
He has been arrested by Enforcement Directorate in connection with Dawood Ibrahim money laundering case. pic.twitter.com/UMAVK5ZEVW
— ANI (@ANI) February 23, 2022
सरदार शहावली खान आणि सलीम पटेल कोण?
सरदार शहाबली खान हा 1993 चे गुन्हेगार आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे ते तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये बॉम्ब ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. टायगर मेमनच्या गाडीत आरडीएक्स भरलं गेलं त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारांनतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे.
आर.आर.पाटील एका इफ्तार पार्टीत गेले होते. त्यामध्ये आर.आर. पाटील यांचा दोष नव्हता. सलीम पटेल याच्यासोबत त्यांचा फोटो चालवला गेला होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. 2007 मध्ये हसीना पारकरला अटक झाल्यानंतर सलीम पटेलला अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावाही फडणवीस यांनी केला होता.
इतर बातम्या :