फडणवीसांविरोधात सुडाचं राजकारण? महाराष्ट्रात आज निवडणूक झाल्यास कुणाला यश? जाणून घ्या टीव्ही 9 मराठीचा पोल

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 'व्हिडीओ बॉम्ब' टाकून खळबळ उडवून दिल्यानंच महाविकास आघाडी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय. अशावेळी आम्ही आमच्या युट्युब, ट्विटर आणि युट्युब कम्युनिटी या सोशल मीडिया हँडलवरुन लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज तुम्हीही घेऊ शकता.

फडणवीसांविरोधात सुडाचं राजकारण? महाराष्ट्रात आज निवडणूक झाल्यास कुणाला यश? जाणून घ्या टीव्ही 9 मराठीचा पोल
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 10:13 PM

मुंबई : पोलीस भरती घोटाळा प्रकरणात रविवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला. त्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) या कारवाईचा निषेध भाजपकडून करण्यात आला. राज्यभरात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या नोटिशीची होळी करण्यात आली. तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरोपी किंवा सहआरोपी करण्याच्या उद्देशानं प्रश्न विचारण्यात आल्याचा दावा करत ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्ला चढवलाय. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘व्हिडीओ बॉम्ब’ टाकून खळबळ उडवून दिल्यानंच महाविकास आघाडी सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय. अशावेळी आम्ही आमच्या युट्युब, ट्विटर आणि युट्युब कम्युनिटी या सोशल मीडिया हँडलवरुन लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज तुम्हीही घेऊ शकता.

युट्युब लाईव्हवरील पोल

देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीमागे सुडाचं राजकारण आहे का? असा सवाल आम्ही युट्युब लाईव्हच्या पोलद्वारे केला होता. त्यावर सुमारे 6 तासात 58 हजार 734 जणांनी आपलं मत व्यक्त केलंय. यातील 50 टक्के लोकांना वाटतं की होय… देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीमागे सुडाचं राजकारण आहे. तर 44 टक्के लोक म्हणतात की यात कुठलंही सुडाचं राजकारण नाही. तर 6 टक्के लोक माहिती नसल्याचं सांगत आहेत.

Youtube Poll

टीव्ही 9 मराठीचा युट्युब लाईव्हवरील पोल

युट्यूब कम्युनिटीवरील पोल

दुसरीकडे युट्यूब कम्युनिटीवरही आम्ही हाच सवाल केला. त्यावर सुमारे 6 तासात 85 हजार लोकांनी आपलं मत व्यक्त केलं. इथे मात्र 54 टक्के लोकांनी फडणवीसांच्या चौकशीमागे कुठलंही सुडाचं राजकारण नसल्याचं मत व्यक्त केलंय. तर 42 टक्के लोकांना फडणवीसांची चौकशी ही सूडबुद्धीने सुरु असल्याचं वाटतं. तर 4 टक्के लोक माहिती नसल्याचं सांगतात.

Youtube Comunity Poll

टीव्ही 9 मराठीचा युट्युब कम्युनिटीवरील पोल

राज्याचं राजकीय चित्र स्पष्ट करणारा ट्विटरवरील पोल

सोशल मीडियावरील प्रसिद्ध ट्विटर या प्लॅटफॉर्मवर आम्ही लोकांना एक महत्वाचा आणि राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट करणारा प्रश्न विचारला. महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर कुणाला मतदान करणार? असा सवाल आम्ही ट्विटर पोलद्वारे विचारला. या पोलमध्ये एकूण 27 हजार 369 जणांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यात राज्यात आज निवडणुका झाल्या तर आम्ही भाजपला मतदान करणार असं तब्बल 60.6 टक्के लोक म्हणत आहेत. तर निम्म्याने अर्थात 30.7 टक्के लोक आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचं सांगत आहेत. 8.7 टक्के लोक मात्र यापैकी नाही असं म्हणत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे, असंच सध्यातरी म्हणावं लागेल.

Twitter Poll

टीव्ही 9 मराठीचा ट्विटरवरील पोल

इतर बातम्या :

‘फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!

मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल असे सवाल केले, देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

VIDEO | महाराष्ट्रात बदल्यांचा महाघोटाळा; रसद केंद्रीय गृहसचिवांना दिली, फडणवीसांचा धमाका!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.