स्वाभिमान म्हणजे काय रे भाऊ?, भाजपचं धनंजय मुंडेंच्या ट्वीटला उत्तर
मुंबई :व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंडय मुंडे यांनी सकाळी भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करत ‘बेस्ट कपल’ असल्याचे म्हटलं होते. मात्र त्याच फोटोला आता भाजपाने एक फोटो पोस्ट करत उत्तर दिलं आहे. यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट […]
मुंबई :व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंडय मुंडे यांनी सकाळी भाजप-शिवसेना सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो पोस्ट करत ‘बेस्ट कपल’ असल्याचे म्हटलं होते. मात्र त्याच फोटोला आता भाजपाने एक फोटो पोस्ट करत उत्तर दिलं आहे.
यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का????#ValentinesDay #TrueLoveDay #Valentines pic.twitter.com/ncld7Qf8HC
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 14, 2019
भाजपने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये थेट धनंजय मुंडेंवर टीका करण्यात आली आहे. हॅपी व्हॅलेंटाईन डे धनंजय मुंडे अशा मथळ्याखाली हा फोटो आहे. यामध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे दिसत आहेत आणि स्वाभिमानाने जगायला शिका असा संदेश गोपीनाथ मुंडेनी दिलेला त्यात दाखवलं आहे. तर फोटोमध्ये साहेब, दादा ताई आज काय करु?? अशी लाचारी धनंजय मुंडे करत असल्याचे या फोटोतून दाखवण्यात आलं आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही यांचेही चित्र आहे.
स्वाभिमान म्हणजे काय रे भाऊ ?#HappyValentineDay @dhananjay_munde !#ValentinesDay #TrueLoveDay #Valentines #TrueSlave pic.twitter.com/jyHybDkYBK
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 14, 2019
सकाळी ट्विटरवर पोस्ट केलेल्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडेंनी ही शिवसेना-भाजपा सरकारची खिल्ली उडवलेली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? गेली पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का”?
युतीवरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरुन अनेक चर्चा सरु आहेत. तर काही अटींवरुन त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. मात्र अजूनही दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकींवरुन एकही अंतिम निर्णय झालेला नाही. नुकतेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान तुमचा तर मुख्यमंत्री आमचा अशी अट त्यांनी भाजपसमोर ठेवली आहे.
व्हिडीओ : शरद पवार निवडणूक लढवणार : अजित पवार