नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये ट्विटरवॉर; राणे म्हणतात मला बोलायला लावू नका!

राऊतांनी भाजप नेत्यांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर आज केंद्रीय मंत्रीन नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. यावेळी राणेंनी अगदी शेलक्या शब्दांचा वापर करत राऊतांना निशाणा बनवलं. त्याचवेळी राणेंनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावरही खोचक शब्दात टीका केलीय. त्यानंतर नार्वेकर आणी राणे यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळत आहे.

नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये ट्विटरवॉर; राणे म्हणतात मला बोलायला लावू नका!
नारायण राणे, मिलिंद नार्वेकर
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:08 PM

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) आरोपांची मालिका आणि त्याला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर आत राज्यात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राऊतांनी भाजप नेत्यांवर केलेल्या गंभीर आरोपानंतर आज केंद्रीय मंत्रीन नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. यावेळी राणेंनी अगदी शेलक्या शब्दांचा वापर करत राऊतांना निशाणा बनवलं. त्याचवेळी राणेंनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावरही खोचक शब्दात टीका केलीय. त्यानंतर नार्वेकर आणी राणे यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळत आहे.

राणेंकडून मिलिंद नार्वेकरांचा ‘मातोश्री’तील बॉय असा उल्लेख

संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.

नार्वेकरांनी राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली!

तर राणेंच्या या टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करुन राणेंना आपल्या मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी किती वेळा फोन केले, याची आठवणच करुन दिली आहे. ‘बॉय का? अच्छा! स्वत:च्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? वाजला का नाही तुमच्या मेमरीची घंटी?’ असा खोचक सवाल नार्वेकर यांनी राणेंना केलाय.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा दाखला देत राणेंचं नार्वेकरांना प्रत्युत्तर

मिलिंद नार्वेकर यांनी राणेंना त्यांनी फोनवरुन केलेल्या विनंतीची आठवण करुन दिली. त्यानंतर राणे यांनीही ट्वीट करत नार्वेकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका’, असा थेट इशाराच राणेंनी नार्वेकरांना दिलाय.

इतर बातम्या :

निधीवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी पुन्हा उघड, आता पक्षाकडे कुणाचं गाऱ्हाण?

Sanjay Raut Vs Bjp : राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे, तर राऊतही म्हणाले होय मी राष्ट्रवादी !

Video| तर कदाचित तू नसतास, नारायण राणेंचे राऊतांवर गंभीर आरोप, कुंडली मांडण्याची धमकी

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.